Get it on Google Play
Download on the App Store

ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।।

ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। श्री साई सच्चरीतात साप आणि बेडकाची कथा येते, एकदा साईबाबा लहानश्या नदीच्या तीरावर बसून एका प्रवासी माणसाशी गप्पा मारत बसलेले, इतक्यात त्यांना बेडकाचा आवाज येतो , प्रवासी माणसाला बेडकाचा आवाज ऐकून राहवत नाही , तेव्हा साईनाथ त्याला सांगतात कि, एक अजस्त्र साप बेडकाला तोंडात धरून गिळण्याचा प्रयत्न करत आहे . तेव्हा प्रवासी माणूस म्हणतो कि आत्ता सर्प बेडूक गिळून टाकणार. साईबाबा सांगतात "असा काहीही होणार नाही, त्याचा बाप (मी) रक्षण करता असताना त्याला काहीही होणार नाही" साईनाथ आणि तो प्रवासी हा प्रसंग जिथे घडत होता त्या ठिकाणी आले, बाबा सर्पाला उद्देशून म्हणाले " अरेय " वीरभद्रप्पा , सर्प आणि बेडकाचा जन्म मिळून सुद्धा अजूनही तुम्हाला उपरती झाली नाही, सोड त्या चेण-बसप्पा ला आणि तुमच्यातील वैर सुद्धा विसरून जा " साईनाथांच्या तोंडून जसे शब्द बाहेर आले, त्याच क्षणी अर्ध्याहून जास्त गिळलेला बेडूक सोडून दिला आणि दोघेही वेगवेगळ्या मार्गाला निघून गेले !! प्रवासी माणूस खूपच आश्चर्य चकित झाला , तेव्हा साईनाथ म्हणाले, फार पूर्वी खूप पवित्र अस महादेवाच देवूळ इथून चार-पाच मैलावर होता, ते जीर्ण झाल्यामुळे त्याची डागडुजी व्हावी म्हणून गावकर्यांनी वर्गणी काढली, आणि ती गावातील धनिक सावकारा कडे दिली , जेणे करून त्याने देखील स्वतः कडचा निधी त्यात टाकून मंदिराच्या डाग-दुजीच काम लवकर होइल. पण सावकार मात्र एकही पैसा टाकायला तयार नव्हता, मंदिराच्या कळसाच काम बरेच दिवस रखडल्यामुळे गावकर्यांनी त्याला स्पष्ट पाने सांगितला कि तुझा हातभार लागला तर रखडलेले काम लगेच होईल!! पण मित भाषी असलेल्या साव्कारांने गावकर्यांना गोडी-गुलाबी ने गुंडाळला . काही दिवसांनी त्याच्या बायकोला महादेवाचा दृष्टांत होतो कि कळसाचा काम तुम्ही पूर्ण करा जो काही खर्च येईल त्याच्या शतपट तुम्हाला मिलेल. तिने आपल्या नवर्याला स्वप्न विषयी सांगितला , पण त्याने तिला सुद्धा गुंडाळला , देव तुझ्याच स्वप्नात का आला, माझ्या का नाही मी तर मंदिराच्या बांधकामाचा हिशोब ठेव्तोये, मंदिर बांधून घेतोये मग मलाच दृष्टांत द्यायला हवा. तुला असाच स्वप्ना पडला असेल . ती बिचार्री गप्प रहिलि. पुन्हा तिला दृष्टांत होतो, "तुझ्या नवर्याला द्यायची इच्छा नसेल तर तू त्याला द्यायला भाग पाडू नकोस, तुला जे काहीही तुझ्या मालकीचा द्यावासा वाटेल ते स्वछ मानाने अर्पण कर" तेव्हा ती ह्यावर नवर्याशी बोलून तिच्या वडिलांनी दिलेले दागिने खर्च करण्याचा निर्णय घेते. सावकाराला हे काही रुचत नाही, तो त्या दागिन्यांचा कमी मोल लावतो, १००० रुपयांचे दागिने असल्याचा सांगून तोच ते दागिने स्वतः विकत घेतो, आणि त्याचा कडे २०० रुपयाला गरीब डुबकी नावाच्या बाईने गहाण ठेवलेली अत्यंत पडीक जमीन , मंदिराच्या कार्यासाठी, दान देतो. इथे तो देवालाही फसवतो, त्या गरीब बाई ला आणि स्वतःच्या बायकोला सुद्धा फ़सव्तो. पुढच्या जन्मी तो सावकार एका ब्राम्हण कुटुंबात जन्माला येतो, त्याचा नाव वीरभद्र , त्याची धार्मिक बायको , त्याच महादेवाच्या मंदिराच्या गुरवाच्या घरी जन्माला येते, आणि ती गरीब डुबकी , मंदिराच्या गुरवाच्या रुपात जन्म घेते त्याचा नाव चेन्नबसप्पा असा अस्त. तो गुरव साईबाबानचा मित्र अस्तो. गौरी साईबाबांना मानत असते, गौरी मोठी होत असताना बाबांनी चेन्न्बासाप्पा ला सांगितले कि हिच्या साठी मुलगा मीच शोधेन, आणि एकदा वीरभद्रप्पा भिक्षा मागत ह्यांच्या कडे आला, एकाच जातीचे असल्यामुळे , साईबाबांनी ह्या दोघांचा लग्न ठरवला.सुरुवाती ला वीरभद्रपा साई बाबांना मानू लागला. त्याकाळी अचानक जमिनीचे भाव खूप वाढले, गौरीच्या सुदैवाने मंदिराच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या जागेला मागणी आलि. ती जमीन १ लाख रुपयाला विकली गेली, (त्त्या दागिन्यांच्या किमती पेक्षा १०० पट हून अधिक) सौद्या मध्ये अर्धी किंमत नगद आणि उरलेली किंमत २५ हफ्त्यान मध्ये माही २००० रुपये अशी ठरली, पण पैसे कुणी घ्यावे ह्यावरून वाद चालू झाला , त्यातून मार्ग काढण्यासाठी सगळे लोक साईनाथान कडे आले , बाबांनी सांगितला हि जमीन मंदिराच्या मालकीची आहे, त्यामुळे मंदिराच्या गुरवा कडे अधिकार आहे, गौरी हि त्या गुरवाची एकुलती-एक मुलगी असल्यामुळे तिच्या परवानगी शिवाय ह्यातील एकही पैसा कुणीही वापरू नये. मग तो नवरा असो किंवा इतर कुणी. ह्यावर वीरभाद्रप्पा नाखूष होऊन, तो गौरीचा नवरा आहे, त्यामुळे सगळा अधिकार त्याचाच आहे आणि पैसे सुद्धा त्यालाच मिळाले पाहिजेत हा दावा करून गौरी ला ओरडू लागला, साईनाथ देवाचा स्मरण करून शांत बसले. त्यानंतर दुपारी गौरी बाबांकडे मशिदी मध्ये पुन्हा आली आणि वीरभाद्रप्पाचे शब्दाचा राग माणू नका, त्याला माफ करा हि विनवी केली, तेव्हा साईनाथांनी तिचे प्रत्येक प्रसंगी विरभाद्रप्पा पासून रक्षण करण्याचे वचन दिले. त्या रात्री गौरी ला स्वप्न पडले , त्यात महादेवाने तिला सांगितले कि,"सगळा पैसा तुझा आहे, त्यामुळे कुणालाही काहीही तू देणा लागत नाही ,मंदिरासाठी काही पैसे चेन्न बसप्पा च्या सल्याने खर्च कर बाकीच्या पैश्यांचा तुला जे काही करायचय ते कर पण मशिदीतील बाबांची परवानगी घेवून. तिने हा दृष्टांत साई नाथांना सांगितला, बाबा म्हणाले " मुख्य रक्कम तुझ्या साठी घे आणि व्याजातील अर्धी रक्कम चेन्न्बसप्पा ला दे , वीरभद्रप्पाचे ह्याशी काहीही संबंध नाही,." इतक्यात वीरभद्रप्पा आणि चेन्न-बसप्पा दोघेही भांडत साईबाबान समोर आले , बाबांनी दृष्टांता विषयी सांगून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण वीरभद्रप्पा प्रचंड संतापलेला , चेन्न-बसप्पा चे तुकडे तुकडे करून गीळेन हे बोलू लागला , चेन्न-बसप्पाने बाबांचे पाय धरले ,माझे विरभद्राप्पा पासून मरण वाचवा, बाबांनी तेव्हा त्याला अभय दिले . कालांतराने वीरभद्रप्पा मरण पावला आणि सर्प योनीत जन्माला आला आणि चेन्नबसप्पा बेडकाच्या योनीत ,पूर्व-जन्मीचे वैर स्मरून सर्प-रुपी वीरभद्रप्पा बेडूक रुपी चेन्न-बसप्पा ला गिळू लागला, तोच ध्वनी ऐकून साईनाथ इथे आले , आणि वीरभद्रप्पा पासून त्याचे ,रक्षण केले . बाबांनी आपले शब्द पाळले . आपण सहज पणे गैरसमजातून किंवा कुणाच्यातरी सांगण्या वरून कितीतरी लोकांशी वैर पत्करतो पण हे "वैर" अश्या प्रकारे फेडावे लागता साईचरित्रातील ४७व्या अध्यायातील हि कथा खूप महत्वपूर्ण आहे. हे असे कुणाशीही वैर धरण्या पेक्षा सद्गुरूंच्या चरणांची कास धरली कि कसलीच चिंता राहत नाही, बाबा तर सहज फेरफटका मारायला बाहेर निघाले आहेत, आपल्या सारख्या सामान्य लोकांना त्यांचा फिरणा सहज वाटू शकता पण ह्या सहज वागण्या मागे सुद्धा त्याच्या अनेक लीला असतात. "तो" त्याचे शब्द कधीच टाकत नाही, तो त्याच्या प्रत्येक शब्द पाळतोच , मग अगदी दृष्टांता मध्ये सांगितलेली १०० पात रक्कम असो कि दिलेला अभय वाचन !!! माझ्याही आयुष्यात असे प्रसंग ठाकले होते १-२ महिन्यान पूर्वी पण हि गोष्ट वाचनात आली होती म्हणून डोक्यात सगळ्या चुकीच्या गोष्टींनी गल्लत नाही केलि. अंबज्ञ ---संकेतसिंह भंडारी

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी