Android app on Google Play

 

डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..

नद्या आणि अध्यात्म नद्यांबरोबर भारतीयांचा आत्मिक, अध्यात्मिक संबंध आहे. गंगा-गोदावरीच्या पाण्याला अपार महत्त्व आहे. गोदावरी व गंगा या दोनच नद्या पुराणांनुसार या पृथ्वीच्या बाहेरून, स्वर्गलोकांतून अवतीर्ण झाल्या आहेत. या नद्यांनी आर्य व भारतीय तत्कालिन निवासी यांचा एकत्रित अंतर्बाह्य गोफ गुंफला आहे. शैव, वैष्णव या दैवीचैतन्य प्रवाहात एकरूप बनून आत्मज्ञानी बनलं होतं, हे सांगणाऱ्या नद्या गंगा, गोदावरी आहेत. पूर्णाहुती - ज्या अग्नीने हे हविद्रर्व्य सर्व देवांपर्यंत पोहोचतं केलं त्या अग्नीच्या तृप्त्यर्थ श्रीफळ किंवा पुगीफलाने महाहुती देतात. संपूर्ण तृप्तीसाठी अखंड तुपाची धार अग्नीमध्ये समंत्रक देतात, याला वसोर्धार म्हणतात. झालेल्या हवनाचं भस्मात रूपांतर होतं. ते धारण करून अग्नीकडे श्रद्धा, मेधा, यश, प्रज्ञा, विद्या पुष्टि, श्रीबल यांची मागणी केली जाते. अग्नीत आहुती दिल्यावर प्रोक्षणीत जो शिल्लक तुपाचा थेंब जमा केला जातो तो अग्नीचा प्रसाद म्हणून घेणं याला 'संश्रव प्राशन' म्हणतात. श्रेयोदान - यजमानाने ब्राह्मणांवर कर्म पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली होती. ती पूर्ण झाल्याने कर्मातून उत्पन्न झालेलं श्रेय अर्थात पुण्य यजमानाला ब्राह्मणांनी सुपारी व अक्षता या रूपात देणं. दान - स्थापन केलेली सर्व वस्त्रं, पात्रं, सप्तधान्य ब्राह्मणांना दक्षिणा, ब्राह्मण सुवासिनींना भोजन, दक्षिणा, सौभाग्य वायन दान इ. सर्व 'इदं न मम' म्हणून दान करणं. दक्षिणा - सुवर्णसहस्रमारभ्य एक सुवर्णपर्यंत यशाशक्ती वित्तशाठ्यविवर्जितं दक्षिणा दद्यात् (सहस्र सुवर्ण मोहरांपासून एक सुवर्ण मोहोरपर्यंत यथाशक्ती परंतु शक्ती असूनही कमी दक्षिणा घेणं अयोग्य आहे.) अभिषेक - स्थापना केलेल्या कलशामध्ये गंगा-गोदावरीचं पाणी भरलं जातं व ते मंत्राने अभिमंत्रित करतात. त्या पवित्र जलाने यजमान व सर्व कुटुंबियांवर समंत्र प्रोक्ष म्हणजेच अवभ्रूत स्नान करववात. प्रत्येक वेळी गंगा किंवा गोदावरी नदीमध्ये स्नान करणं शक्य नसतं. यासाठी समंत्रक पोक्ष आवश्यक आहे. गंगा-गोदावरीच्या पाण्याला अपार महत्त्व प्राप्त झालं आहे. गोदावरी व गंगा या दोनच नद्या पुराणांनुसार या पृथ्वीच्या बाहेरून स्वर्गलोकांतून अवतीर्ण झाल्या आहेत. बहिरार्णवी उदक अणिले, अशी प्रगाढ श्रद्धा सर्व भारतीयांची आहे. भगीरथाने शापित सागरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी व गौतम ऋषींनी गोहत्येचं पातक नाहीसं होण्यासाठी कठोर तप करून गंगा, गोदावरीचा उगम पृथ्वीवर करवला. यासंदर्भात उद्धारकर्ता, पापविनाशक, अगणिक पुण्यकारक म्हणून या दोन नद्यांचा महिमा वर्णन करणाऱ्या इतरही पूरक कथा, आख्यानं आहेत. आज २१ व्या शतकात पुराणात दडलेलं विज्ञान व त्या माध्यमातून आपल्या पूर्वजांची असाधारण मानसिक, बौद्धिक क्षमता यांचा प्रत्यय नव्या पिढीला करून दिला तर अध्यात्ममय जगणं कशासाठी या प्रश्नाची उकल त्यांना करता येईल. पौर्वात्य देशांमध्ये नद्या मानवाच्या सांस्कृतिक विकासात सहभागी आहेत. भारतात नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विकसित झालेल्या सुपीक धरणीला वैदिक ऋषींनी हिरण्यमय लोक श्रीभूमी दिव्यभूमी म्हटलं आहे. गौतम ऋषींच्या काळी आश्रमवासी अन्य ऋषींची उपजीविका स्वतः पिकवलेल्या साळींच्या आधारे चालत असे. त्यात विद्यार्थी अतिथी गाय-वासरं यांचंही भोजन सामावलेलं असे. नद्यांबरोबर भारतीयांचा आत्मिक, अध्यात्मिक संबंध आहे. या नद्यांनी आर्य व भारतीय तत्कालिन निवासी यांचा एकत्रित अंतर्बाह्य गोफ गुंफला आहे. शैव, वैष्णव या दैवीचैतन्य प्रवाहात एकरूप बनून आत्मज्ञानी बनलं होतं, हे सांगणाऱ्या नद्या गंगा, गोदावरी आहेत. भवभूतीचं उत्तररामचरित्र गोदावरीच्या साक्षीने, सहकार्याने करूण रसप्रवाही बनलं आहे. भारतीयांनी ज्योतिष, खगोलशास्त्र, अणुऊर्जाशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र याचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता हे जाणवून देणारे पर्व म्हणजे 'गंगापूजन' होय. गुरु ग्रह सूर्याची ऊर्जा मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करत असतो. त्या लहरी पृथ्वीवरही येतात. सिंह राशीत गुरु, रवि, चंद्र एका राशीत असताना गुरु ग्रहावरुन प्रक्षेपित ऊर्जा चुंबकीय शक्तीने काही विशिष्ट ठिकाणी खेचली जाते. पश्चिम वाहिनी गोदावरी २० अंश कोनातून ज्या ठिकाणी दक्षिणेकडे प्रवाहित होते त्या रामकुंडाच्या उत्तर ईशान्य बाजूला नाशिकला गोदावरीचं पुरातन मंदिर बांधून या संशोधनावर शिक्कामोर्तब केलं आहे. या ठिकाणी चुंबकीय शक्ती निर्माण होते. ती अपूर्व अशी चैतन्य ऊर्जा पाण्यातून शरीरात प्रवेश करते. म्हणून सिंहस्थ काळात गोदावरी मातेच्या प्रवाहात स्नान करण्याचे विशिष्ट प्रयोजन आहे. या विशिष्ट ठिकाणी अस्थी टाकल्यास त्यांचं साडेतीन तासात पाणी होतं असा अनुभव आहे. गोदावरी नदी सिंहस्थ काळात पृथ्वीवर अवतीर्ण झाली आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच गंगा-गोदावरीच्या पाण्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच गंगा-गोदावरीच्या जलाने अवर्भूत स्नानाचं महत्त्व प्राप्त झालं आहे. या सर्व गोष्टींनंतर खालील मंत्राने गुरुजींना ठरलेल्या प्रमाणे दक्षिणा द्यावी. ''दानं मम विभूत्यर्थ गृहाण बं द्विजोत्तम। प्रीयतांने जगद्योनिर्वास्तुरुपी जनार्दन।।'' वास्तूनिक्षेप - वास्तूप्रतिमा ज्यावर सर्व देव बसले असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, असं मानलं जातं. थोडक्यात म्हणजे त्या वास्तू-प्रतिमेवर सुसंस्कार व वैश्विक चैतन्याचं तेज चढलेलं असतं. यासाठी ही वास्तूप्रतिमा घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये २x२x२ इंच आकाराचा खड्डा करून त्यात गोमय, गोमूत्र किंवा पंचगव्य, शेवाळ टाकावी. वास्तूप्रतिमा एखाद्या पेटीमध्ये किंवा डबीमध्ये पालथी ठेवावी आणि ती डबी त्या खड्ड्यामध्ये ठेऊन वरून तो खड्डा बुजवून टाकावा. त्यावर पाणी टाकून 'नमस्ते वास्तूपुरुष भूशय्याभिरत प्रभ। मदगृहे धनाधन्यादी समृद्धी करु सर्वदा।।' असं म्हणून प्रार्थना करावी. वास्तुशांतीत, ॐ वास्तेष्पते प्रतिजानिह्यस्मान त्स्वावेशो अनमीवो भवानः। यत त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शंनो भव द्विपदे शं चतुष्पदे।। या मंत्राने वास्तूदेवतेचं आवाहन व मुख्य वहन केलं जातं. त्याचा भावार्थ हे वास्तुदेवते, आम्ही आपले उपासक आहोत यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि आमची प्रार्थना ऐकून आम्हा सर्वांना अधि-व्याधीतून मुक्त करा. धनैश्वर्य प्रदान करा व या जागेत राहणारे स्त्री-पुत्रादी परिजन तसंच गो अश्वादी चतुष्पाद यांचं कल्याण करा व अन्य प्रकारचे अनेक मंत्र कर्मकांड ग्रंथ व सूत्र ग्रंथात आहे. (भाद्रपद, अश्विन), कार्तिक या महिन्यात पूर्व दिशेला, मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात दक्षिण दिशेला, फाल्गुन (चैत्र), वैशाख या महिन्यात पश्चिम दिशेला व जेष्ठ (आषढ) श्रावण या महिन्यात उत्तर दिशेला वास्तूचं मुख असावं. (कंसात दिलेल्या महिन्यात वास्तू मुहूर्त नसतात) एह्येहिभगवान्वास्तो सपरिवारो इमं मयोपनीतं बलि गृहाण मम गृहमच्छिद्रं कुरुकरु सकल दुष्टे भ्यो मां रक्षरक्ष स्वाहा, अशी प्रार्थना करावी. साभार - अमोल यादव

शोध दैवी शक्तींचा (भय कथा)

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1
कल्की अवतार
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1
हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2
योगसामर्थ्य 1
योगसामर्थ्य 2
तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1
तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2
कसबा गणपती
इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव
रुद्राभिषेक
भविष्यकथानाची सिद्धी 1
भविष्यकथानाची सिद्धी 2
भविष्यकथानाची सिद्धी 3
शोध अश्वत्थामाचा 3
Naustradamus 1
Naustradamus 2
कोकणेश्वर महादेव
लावणी ६४ वी
एका अप्सरेच्या मुली
नेपाळमध्ये मोठा भूकंप
मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले
जगातील सहा न उलगडलेले रहस्य .
चेटकीण प्रथेचा काळा इतिहास
संत नामदेव
शिव
भारतामधील Top 10 मंदिरे
दैवी शक्ती
पृथ्वीच्या पाठीवर
सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण
पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र
वास्तुपुरुष
गुढीपाडवा
देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये
पोस्ट दैवी शक्तीं
मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........
संतांचा सहवास
सध्या दैवी शक्ती
ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।।
।।ॐ।। ओम नम: शिवाय।
भारताने लावलेले शोध
योगीराज संत सोहिरोबानाथ...
महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी
द अंबेर रुम
मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय?
हिंदू धर्म
महाभारत एक प्राचीन ग्रंथ
तीर्थस्थळाचे नाव
महात्मा बसवेश्वर
चैत्र शुद्ध नवमी
गंगासागर
भारतातील ऋषीमुनीं
विमानाचा शोध
भगवान श्रीकृष्ण
महाराष्ट्रात महानुभाव
अघोरी
कुलइतिहास
द्रौपदीला
द्रौपदीचे वस्त्रहरण
दत्ताची नावे
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..
आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..
भाग २ रा ....रुपकुंड
श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.
भारतीय संस्कृती
महाराज कोण होते, कोठून आले
दैवी किंवा देवता
‘गावपळण!’
गणपती विषयी
काळभैरव
13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....
वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण
गरुडपुराण
प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...
|| गणपती बाप्पा मोरया ||
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर
पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...
श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात)
मयंग : आसाम
गावाचे नाव :- वालावल
मल्हारी मार्तंड खंडोबा
डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..
दत्तावतारी
**** भूतांचे प्रकार **** भाग १-
Part - 1 पिशाच्च
रुद्राक्ष भाग २
माफ करा वाचकांनो
आजचे अनुभव
||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||
चक्र
आपण जानता आहात का ?
गुरु सामर्थ्य
मी तन्वी रेडी
नामस्मरण
नामसाधनेची
येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार !
१९२१ सालची गोष्ट
दिनदर्शिकेप्रमाणे
महाभारतातल्या
हिमालयीन यती/ हिममानव:-
अखंड नामस्मर
मनुष्य हा कल्पना विलास
तबकड्या बहुधा पाण्यावर
ध्यानावस्थेत
भगवान पतंजली
महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या
सोमजाई देवीचा इतिहास
लावणी ४४ वी