दिनदर्शिकेप्रमाणे
दिनदर्शिकेप्रमाणे बांधकाम याचा अर्थ दिनादार्शिकेमध्ये उल्लेख केल्यानुसार इमारतीच्या ठराविक पायऱ्या ठराविक दिवसातच बांधल्या गेल्या पाहिजेत. पायर्यांवरील चौथरा त्यानंतर काही महिन्यात तर त्यावरील मंदिर पुढील ठराविक वर्षात पुर व्हायला हवं, अशा तर्हेने प्रत्येक वास्तुच नव्हे; तर वस्तूची पायरी न पायरी त्या दिनदर्शिकेप्रमाणे बांधली गेली आहे. पुढील हजारो वर्ष टिकतील अशी बांधकाम, मंदिर, शहर, पिरामिडस सोडून हे लोक एकेकी परागंदा झाले. ते का गेले याची आज काहीच माहिती नाही. पाश्चात्य पुरातत्त्वावेत्यांनी त्यावर पुष्कळ मत मांडली. हवामानातील बदल, रोगांची साथ अशा कारणामुळे मायांनी आपल्या नगराचा त्याग केला असावा, अस म्हटलं जात. परंतु या करांना कोणताही सबळ पुरावा नाही. मग एकेकी काय घडल असेल / परचक्र आल असेल का ? पण तास म्हणव तर माता संस्कृती तेव्हा प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर होती. त्यांच्याशी सामना करायला कोण धजावणार होत ?
अर्जुनानं तर ते धाडस केल नसेल ? तीच अतिशय दात शक्यता आहे. उंच धिप्पाड लोक, बराच काळ सागरावरून उड्डाण, विशाल काय कासव अशी वर्णन दक्षिण अमेरिकेलाच लागू पडतात. तिथे मातालीसः जाऊन अर्जूनान निवातकवच दानवाना कस पराजित केल याच इत्थंभूत वर्णन महाभारतातील वनपर्वात दिल आहे.मायालोक म्हणजेच निवातकवच होते का ? शक्य आहे ! त्याच्याजवळ असलेलं वास्तुनिर्मितीची दिनदर्शिका खरोखर त्यांचच होत का देवांचं ? त्या दिनदर्शिकेनुसार भव्य वेधशाळांची-मंदिरांची, पिरामिडची बांधकाम त्यांनी केली होती का देवांनी या गहन आणि आजवर न सुटलेल्या कोड्याच उत्तर मातालीच्या उत्तरात मिळत.
निवातकवच दानावांशी अर्जुनाच प्रचंड मायावी युद्ध झाल. दानवांना पराजित करून अर्जूनान नगरात प्रवेश केला तेव्हा ते नगर ओस पसलेल होत. कुठे गेले होते ते लोक ? तिथून २२५ मैलांच अंतर आहे. नगर सोडून निवातकवच दानव तेवढ्या अंतरावर जाऊन स्थिरावण सहज शक्य आहे.
रित्या नगरात अर्जूनान मातालीसह परेश केला तेव्हा त्याला एका भव्य नगराचा साक्षात्कार घडला. भव्य बांधकाम, मंदिर, उत्तुंग वास्तू, त्यांच्यावर जडलेली किमती रत्न अस नगराच दर्शन होऊन अर्जुन थक्क होऊन गेला. तो मातलीला म्हणाला, "केवढ भव्यदिव्य नगर वसवलं होत या दानवांनी ! देवांच्या नागरापेक्षाही श्रेष्ठ !"
तेव्हा मातली त्याला सांगते, "पार्था हे देवांच्च नगर होत. या नगराच, इथल्या भव्य आणि समृद्ध वास्तुच बांधकाम देवांचच ! या दानवांनी ते देवाकडून जिंकून घेतलं होत. देवानाही ते दानव अजिंक्य ठरले होते.त्यांना तू एकट्यान जिंकलस !"
निवातकवच दानव म्हणजे माया लोक हे अनुमान वरील उदाहरणावरून निघू शकत का ? या दानवांनी देवाकडूनच भव्य बांधकामाची दीक्षा घेतली होती का ? मयासुर हा मुळ माया संस्कृतीतलाच होता का ? त्यान जेव्हा मयसभा बांधली तेव्हा त्या दिव्य मयसभेचा आकार त्यान देवांच्या विमानाप्रमाणे केला होता. देवांच्या विमानाचा संधर्भ आणि त्याच डिझाईन त्याला कुठे मिळाल होत ? निवातकवच म्हणजेच माया संस्कृतीतील देवांमध्ये वावरणारे लोक हे गृहीत धरल्यावर अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते.
आज अमेरिका एखाद्या महत्त्वाकांक्षी राष्ट्राला पोसते आणि ते राष्ट्र अमेरिकेकडूनच शस्त्रास्त्र-तंत्रज्ञान-पैसा घेऊन अमेरिकेवरच हल्ला करत ! तसाच काहीस पाच हजार वर्षापूर्वी घडल होत का ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण देवणी जेव्हा पृथ्वीवर वास्तव्य केल तेव्हा प्रसंगी त्यांना अनेक युद्धही करावी लागली, इथल्या अविकसित समुदायांवर दहशदाही बसवावी लागली, याचे पुरावे मिळतात. एवढच नव्हे तर देवणी इथल्या स्त्रियांवर अत्याचार केल्याचे संदर्भ मिळतात. निवातकवच-मायालोकांच्या संदर्भात तसच घडल होत का ? देवांकडून सर तंत्रज्ञान घेऊन त्यांनी देवांवरच त्याचा प्रयोग केला होता का ?देव सुद्धा पराजित होत होते हे निवातकवच-अर्जुन प्रसंगावरून स्पष्टच होत. देव म्हणजे परब्रम्ह परमेश्वर असते तर ते मानवाकडून पराभूत कसे झाले असते ? दानवांकडून कोणते राजकारण तेव्हा घडले असेल ?
देवणी कुठे कुठे आपल साम्राज्य प्रस्तापित केल होत ! मंत्रपुष्पांजलीमधील श्लोक पहा: ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि ... ॐ स्वस्ति, साम्राज्य, भोज्य, स्वाराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य राज्य महाराज्यमधिपत्यमय समंतपर्यायी स्यात्... पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति... म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर सप्तसागरांमध्ये देवच आधिपत्य असाव १ कारण जगातल्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये आणि अनेक जमातीमधील पुराणांमध्ये देवांचा आणि त्यांच्या इथल्या वास्तव्याचा संदर्भ आहे.
म्हणजे दक्षिण अमेरिकेतील पेरू देश. तिथल नाझकाच पठार, बोलिव्हिया, मेक्सिको, अमेरिका, चिली, मध्य आशिया, युरोप, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत, आफ्रिका म्हणजेच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात देवांच्या-परग्रहावरील अतिमांनवांच्या संदर्भात पुरावे सापडतात.
अनेक पुरावे अतासून आपण या निर्णयाप्रत येऊ शकतो कि, हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर देवांचं आगमन झाल. काही शे किंवा काही हजार वर्ष या पृथ्वीवर वास्तव्य केल. त्यांच्या आगमनामुळे इथला अप्रगत मानवी समूह थक्क होऊन गेला. त्याला हे परग्रहावरचे अंतराळवीर म्हणजेच साक्षात परमेश्वर वाटू लागले. कारण अग्नीवर स्वार होऊन ते आकाशात संचार करीत, छोटयाश्या अस्त्रान प्रचंड विध्वंस घडवीत, त्यांच्याकडे अतर्क्य अशी अनेक साधने होती, त्यांची विमान पारदर्शक दगडाची होती, विमानांमध्ये अग्नी होता पण तो थंड होता ! त्यांनी पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्यांनीच मानव धर्माची प्रस्थापना केली. मानवी समुदायावर प्रेम केल, इथल्या राजाला ते अंतरालाठी घेऊन गेले ! त्यांच्याशिवाय जीवनाला काहीही अर्थ नाही.
द्वांच्या पुनरागमनाची पिढ्यापिढ्या वाट पाहत राहण तेवढ आपल्या हातात आहे !
संदर्भ :- देवांच्या राज्यात
लेखक:- राजेन्द्र खेर