Get it on Google Play
Download on the App Store

प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...

नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते. त्यापैकी एक प्रमुख महासिद्ध मच्छिंद्रनाथ हे प्रसिद्ध आहेत. स्वतः शिव हा नाथपंथातील एक गुरू आदिनाथ म्हणून ओळखला जातो. मत्स्येंद्रनाथ आणि त्याचा शिष्य गोरक्षनाथ (म्हणजेच मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ) या गुरू-शिष्यांच्या सभोवती गुढाचे एक वलय निर्माण केले जाते. मच्छिंद्रनाथाचा जन्म माशाच्या पोटात झाल्याच्या चमत्कृतीपूर्ण कथा प्रसिद्ध आहेत. हठयोग त्यातील कुंडलीनी जागृती, चक्रे, बंध इ. मुळे चमत्कार, शक्ती, विद्या वगैरेंशी नाथपंथाची सांगड घातली जाते. कुंडलिनी ही एक अदृश्य आध्यात्मिक शक्ती आहे. ती मेरुदंडाच्या मुळाशी निद्रिस्त अवस्थेत असते. ही शक्ती जागृत होते तेव्हा ती सुषुम्ना नाडीच्या मुखात प्रवेश करते. मानवी शरीरात 72000 नाड्या असतात. त्यातील इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्तजिहवा, पुषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू, शंखिनी या दहा नाड्या सर्वज्ञात आहेत. त्यातल्या त्यात इडा, पिंगला आणि सुषुम्ना या महत्त्वाच्या नाड्या मानल्या जातात. श्वास सुषुम्ना नाडीतून वाहायला लागतो, तेव्हा मन स्थिर होते आणि त्याची शून्यावस्था होते. योगसाधनेतील हीच एक फलश्रुती असते की तेव्हा इडा, पिंगलातून वाहणारा श्वास सुषुम्नेतून वाहू लागतो. यासाठी नाड्यांची शुद्धी होणे अनिवार्य असते. धौति, बस्ती, नेति, लौलिकी, त्नाटक, कपालभाती ही ती सहा प्रकारची षटकर्मे म्हणजे शुद्धिक्रिया आहेत. यांचा अभ्यास करून नाड्यांची शुद्धी करता येते. याला ‘निर्मनु’ असे म्हणतात. ‘समनु’चा अभ्यास करण्याची प्रत्यक्ष कृती पुढीलप्रमाणे आहे. पद्मासनात बसा, वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ वर मन एकाग्र करा. या ‘यं’चा 16 अंक मोजेपर्यंत उच्चार करीत डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, त्यावेळी उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठय़ाने हलकीशी दाबून ठेवा. नंतर 64 अंक मोजेपर्यंत ‘यं’ चा उच्चार करीत श्वास रोखून ठेवा. नंतर 32 वेळा अंक मोजेपर्यंत ‘यं’चा उच्चार करीत श्वास बाहेर सोडा. आता मणिपूरचक्र, नाभी-स्थानी यालाच अग्नितत्त्वाचे स्थानही म्हणतात. ध्यान लावा, अग्नीचा बीजाक्षर ‘रं’ आहे. 16 अंक मोजेपर्यंत ‘रं’चा उच्चार करीत उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. त्याचवेळेस उजव्या हाताची करंगळी आणि अनामिका यांनी डावी नाकपुडी हलकेच दाबून ठेवा. 64 वेळा अंक मोजेपर्यंत ‘रं’चा उच्चार करीत श्वास आतच रोखून ठेवा. नंतर 32 वेळा ‘रं’चा उच्चार करीत श्वास बाहेर सोडा. आता नाकाच्या शेंड्यावर मनाला एकाग्र करा. ‘ठं’ या बीज मंत्नाचा 16 वेळा उच्चार करीत डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 64 वेळा ‘ठं’चा उच्चार करीत श्वास आतच रोखून ठेवा. नंतर पृथ्वी तत्त्वाचे बीजाक्षर ‘लं’चा 32 वेळा उच्चार करीत श्वास बाहेर सोडा. मानवी शरीरात सहा केंद्रे कमळाच्या पाकळ्यांच्या रूपात दर्शविले जातात. 1) मुलाधारचक्र हे शिवणीच्या खाली चार पाकळ्यांच्या रूपात मानले जाते. 2) स्वाधिष्ठान चक्र हे जननेंद्रीयांच्यावर सहा पाकळ्यांमध्ये 3) मणिपूरचक्र हे नाभीस्थानाचे दशदल कमळ 4) अनाहतचक्र हे हृदयस्थानी 12 पाकळ्यांचे कमळ 5) विशुद्धचक्र कंठस्थानी 16 पाकळ्यांचे कमळ 6) आज्ञाचक्र हे भृमध्यस्थानी दोन्ही भुवयांच्यामध्ये 2 पाकळ्यांचे कमळ, तर सातवे सहस्त्रारचक्र टाळूस्थानी सहस्त्र पाकळ्याचे कमळ मानले जाते. सहा चक्रांचा भेद करून कुंडलिनीशक्ती या चक्रात स्थिरावते. प्रत्यक्ष कुंडलिनी जागृती.. कपालभाती आणि भस्त्रिका यांच्या अभ्यासाने मूलाधारचक्रापाशी प्रकर्षाने धक्के बसत असतात. त्यामुळे हे प्राणायाम फारच प्रभावी समजले जातात. तथापी ऊँ चा उच्चार करून त्याच्या स्पंदनांची जाणीव मूलाधार चक्राशी केल्यास विशेष फायदा होतो. मनात ऊँ हा मंत्र म्हणत असताना उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठय़ाने बंद करा व डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. पूर्णपणे श्वास आत घेऊन झाल्यावर डावी नाकपुडीही बंद करा शक्य होईपर्यंत श्वास आतच राखून ठेवा. नंतर डाव्या नाकपुडीवरचा दाब तसाच ठेवून फक्त उजवी नाकपुडी उघडी करा व ऊँ चा दीर्घ मंत्रोच्चार करीत उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा. हाच प्रयोग उजव्या नाकपुडीने घेऊन डावीने सोडणे असाही करावा. पूरक, कुंभक आणि रेचक करताना पूर्व किंवा उत्तर दिशेस तोंड करून ब्रह्ममुहूर्तावर कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा. एकाचवेळी दोन्ही नाकपुड्यातून संथ लयीत पूर्ण पोटभरून श्वास आत घ्या आणि आता अनुभव करा की, मूलाधार चक्रस्थानी कुंडलिनीशक्ती जागृत होऊन एक एक चक्राचा भेद करीत वरवर येत आहे. कुंडलिनी वरवर जात असताना प्रत्येक चक्राचे मानसिक दर्शन घ्या. जेवढे स्पष्ट दर्शन होईल तेवढा जास्त आनंद येईल. नंतर श्वास आतच रोखून ठेवा. ऊँ चा उच्चार मनातल्या मनात सुरू राहू द्या. सहस्राधारचक्रावर एकाग्रता साधा. ज्ञान, ऊर्जा आणि प्रकाशाने पूर्णांशाने शरीर सम्प्रुक्त झाले आहे, असा अनुभव घ्या. नंतर हळूहळू श्वास बाहेर सोडा (रेचक करा) त्याचवेळी कुंडलिनीशक्ती हळूहळू सहस्राधाराहून क्रमाक्रमाने मूलाधारापर्यंत येते अशी कल्पना करा. (लक्षात ठेवा :- पहिले योगा क्लास लावा ..योग गुरु यांच्या मार्गदर्शनातच करायच ...)

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी