Get it on Google Play
Download on the App Store

आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..

आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. Pic 1 : मुमताझबेगमला तिच्या मृत्युपश्चात बुऱ्हाणपुरात ज्या ठिकाणी पुरली ती जागा. Pic 2 : जवळपास सहा महिन्यानंतर तिचे प्रेत उकरुन आग्र्यात ज्या ठिकाणी ठेवले होते ती जागा Pic 3 : ताजमहालावरची गणेशसदृश नक्षी Pic 4 : ताजमहालाच्या हत्ती दरवाज्यातील रिकामा गणेश कोपरा Pic 5 : ॐ सदृश कोरीवकाम Pic 6 : ताजमहालाची मागील बाजु, त्याबाजुला असणारे अनेक कक्ष दिसत आहेत. Pic - 7 : ताजमहालाच्या दरवाज्यावर दिसणारी वेलबुट्टीची नक्षी आता ह्या संदर्भातले मुघल दरबाराचे दुसरे पत्र म्हणजे औरंगजेबाचे. औरंगजेब हा सन १६५२ मध्ये दिल्लीच्या उत्तरेस मुक्कामास असताना शहाजहानने त्याला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्त केले आणि देवगिरी (दौलताबाद) पासून पाच मैल लांब असलेल्या खडकी नगरात जाऊन रहायला सांगितले. दक्षिणेतील नविन हुद्दयावर रुजु होण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत जात असताना आग्र्यात त्याने मुक्काम केला. त्या प्रसंगी आपल्या अम्मीची नविन कबर पाहण्यासाठी तो गेला, त्या कबरीच्या सौंदर्याचे वर्णन करणारे एक पत्र त्याने आपल्या अब्बाजानला पाठवले. हे पत्र औरंगजेबाच्या तीन बखरीमध्ये ( यादगारनामा, आदाब-ए-आलमगिरी आणि मुरक्का-ए-अकबराबादी ) उपलब्ध आहे. औरंगजेबाच्या या पत्राप्रमाणे ……. “…….. दुसरा दिवस शुक्रवार असल्यामुळे मी त्या पवित्र थडग्याला भेट द्यायला गेलो जेथे आपल्या आदेशाने दफनविधी झाला होता. त्या इमारतीचा घुमट उत्तरेच्या बाजुस पावसाळ्यात दोन-तीन ठिकाणी गळतो. तसेच वरच्या मजल्यावर ज्या राजेशाही खोल्या आहेत त्या, घुमटाच्या चारही बाजुला असलेले चार छत्रे, त्याचे उत्तरेकडील भाग आणी त्यातील गुप्त खोल्या, सात मजली इमारतीची छते व मोठ्या घुमटाचे जामपोश ह्या सर्व ठिकाणी पाणी मुरुन ते चालु पावसाळ्यात गळत असलेले मी पाहिले, मी त्या सर्वाची तात्पुरती डागडुजी केली आहे, पण ह्या परिसरातील विविध घुमट, मशिदी, जमायतखाना (धर्मशाळा) वगैरे इमारतींची पुढे येणाऱ्या अनेक पावसाळ्यात खुपच वाईट अवस्था होईल. ह्या सर्वांची काळजीपुर्वक उत्तम दुरुस्ती होणे आवश्यक आहे. वरच्या मजल्याचे छत उघडून चुना, विटा, दगड वापरुन ते नीट सुधारणे आवश्यक आहे. लहान मोठ्या बुरुजांची नीट दुरुस्ती केली तर ह्या इमारतीची पडझड होणे थांबेल. आपण बादशहा सलामतांनी ह्याकडे लक्ष पुरवून दुरुस्ती करवावी. मेहताब बाग (अर्थात चंद्र उद्यान) सारे पाण्यात थबथबून भयाण दिसते. पुर ओसरल्यावरच पुन्हा ह्या बागेचे सौंदर्य प्रगट होईल. ह्या इमारतीचा पिछाडीचा नदीकाठचा भाग मात्र सुरक्षित आहे ह्याबद्दल मला फार आश्चर्य वाटते……….” शहजादा औरंगजेबाच्या वरील पत्रातही ’ताजमहाल’ ह्या शब्दाचा उल्लेख नाही. सध्या पुरातत्व खात्याने ताजमहालाच्या प्रवेशद्वारापाशी हिंदीत व इंग्रजीत दोन शिलांवर असे लिहुन ठेवले आहे की शहाजहानने मुमताझची कबर म्हणून सन १६३१ ते १६५३ ह्या काळात ताजमहाल नवा कोरा बांधुन काढला. हे जर खरे असते, तर सन १६५२ मध्येच सर्व इमारती जीर्ण झाल्याने गळत आहेत व त्यांची जुजबी दुरुस्ती मी करुन जात असून बादशहा सलामतने आणखीन पक्की दुरुस्ती करणे आवश्यक आहे असा उल्लेख औरंगजेबाच्या पत्रात आलाच नसता. शहजादा मेहताब बागेचा उल्लेख करतो, त्याअर्थी तेजोमहालयाच्या उद्यानास पुर्वापार चंद्रोद्यान म्हणत व त्या बागेत संगमरवरी तेजोमहालयाची शुभ्रकांती चंद्राच्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशात उजळलेली पहाणे ही प्राचीन हिंदु परंपरा असल्याचे स्पष्ट होते. भर पावसाळ्यात सगळीकडे पावसाचे पाणी तुडूंब भरलेले असताना तेजोमहालयाच्या मागच्या बाजुस वाहणाऱ्या यमुना नदीला दुथडी भरुन पुर आलेला असून सुद्धा तिचे पाणी तेजोमहालयाच्या भिंतींपासून दूर कसे वाहते ह्याबद्दल शहजादा औरंगजेबाने आश्चर्य प्रकट केलेले आहे. शहाजहानच्या कारकिर्दीत मोघल कारागिरांनी सन १६५२ मध्ये जर ताजमहाल बांधुन पुर्ण केला असता, तर तत्पुर्वी किंवा बांधकाम चालु असताना तिथे पोहोचलेल्या औरंगजेबाने स्वत: तिथल्या तिथे बांधकाम करणाऱ्या कारागिरांना हा प्रश्न विचारला असता की नाही? गंगा, यमुना, सरस्वती वगैरे संपुर्ण भारतात पसरलेल्या नद्यांवर ठाईठाई कित्येक वर्षे टिकणारे भक्कम घाट बांधणाऱ्या हिंदुंनाच या नद्यांचा जोरदार प्रवाह बांधकामांपासून दुरवरुन वाहावत नेण्याचे तंत्र माहिती होते. या कामगिरीसाठी आग्रा येथे वापरण्यात आलेले तंत्र म्हणजे तेजोमहालयाच्या पाठीमागच्या जमीनीत विहीरीच्या घेराचे मोठमोठे भरभक्कम बुरुज बांधुन काढलेले असून, हे बुरुज यमुनेचे पाणी तेजोमहालयाच्या तटापासून दूर ठेवतात. शहजाद्याने त्याच्या वरील पत्रात मशिद म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, ती प्रत्यक्षात मशिद नसून तेजोमहालयाची धर्मशाळा आहे. हुबेहुब एकाच आकाराच्या दोन धर्मशाळा तेजोमहालयाच्या पुर्वेस आणि पश्चिमेस आहेत, पण बादशहाने तो परिसर ताब्यात घेतल्यापासून पश्चिमेकडील धर्मशाळा मुसलमान लोकं मशिद म्हणून वापरतात. वरील दोन अस्सल कागदपत्रांशिवाय अजुन काही पुरावे आहेत, त्यातील जयपूर संस्थानाच्या महाराजांच्या वैयक्तिक कागदपत्रांत तेजोमहालयासंदर्भात दोन महत्वाची कागदपत्रे आहेत. १) फर्मानाची प्रत दि. २६ जमाद उल आखिर, १०४३ हिजरी सन, शहाजहान बादशहाच्या राज्यकारभाराचे सहावे वर्ष, १८ डिसेंबर १६३३ मोघल दरबारातर्फे मिर्जा राजा जयसिंगाला लिहिलेले पत्र, तेजोमहालयाच्या मोबदल्यात जयपूरच्या महाराजांस चार हवेल्या देण्यासंबंधीचे पत्र. २) फर्मान दि. २६ जमाल-उल-आखिर, हिजरी सन १०४३, शहाजहान बादशहाच्या राज्यकारभाराचे सहावे वर्ष, डिसेंबर १८, १६३३ मोघल दरबाराकडुन मिर्जा राजा जयसिंगास आलेले पत्र, त्यात असे म्हटले आहे की “ताजमहालासाठी” राजा मानसिंगाची हवेली आणि त्याच्या सभोवतालचा जो परिसर मोघल दरबाराने घेतला त्याच्या मोबदल्यात जयसिंगास चार हवेल्या देण्यात आल्या, त्या चार हवेल्यांच्या पाच स्वामींची नावे – भगवानदास, माधवसिंग, रुपाजी बैरागी, सुरत आणि स्वरुपसिंहाचा पुत्र चंद्रसिंग. चार हवेल्यांचे पाच मालक जयपूर राजघराण्याचे असण्याचे कारण की आग्र्या शहर जयपूर राजघराण्यानी ताब्यात घेतल्यानंतर तेजोमहालय / मानसिंह महाल याची निर्मिती झाली, त्या राजमहालावर पिढ्यानपिढ्या जयपूर संस्थानाचाच हक्क होता. शहाजहानच्या कारकिर्दीच्या वेळी तेजोमहालय परिसरातील चार प्रमुख इमारती पाच जणांच्या मालकीच्या झाल्या. त्या चार हवेल्यातील एक हवेली म्हणजे लाल दगडाचे सात मजली भव्य प्रवेशद्वार, दुसरी हवेली म्हणजे वर संगमरवर आणि खाली लाल दगडाचा तेजोमहालय, तिसरी सात मजली हवेली म्हणजे संगमरवरी तेजोमहालयाकडच्या पश्चिमेकडील इमारत जी सध्या मशिद म्हणून वापरली जाते आणि चौथी सात मजली हवेली म्हणजे पश्चिमेकडील धर्मशाळेच्या जोडीची पुर्वेस असणारी इमारत / धर्मशाळा. ह्या पत्रांखेरीज तेजोमहालयाच्या संदर्भात शहाजहान बादशहाने मिर्जा राजा जयसिंगांना अजून तीन पत्रे पाठविल्याचे उल्लेख सापडतात. त्या तीन पत्रांमधून बादशहाने संगमरवराची मागणी केल्याचे कळते. कदाचीत जयसिंगांनी संगमरवर पाठवला असेल किंवा नसेलही. ह्या तीन पत्रांशिवाय तेजोमहालयाच्या संदर्भात दरबाराचा काहीही पत्रव्यवहार नाही. खरंच जर शहाजहान बादशहाने ताजमहाल बांधवला असता तर त्या संदर्भातली शेकडो / हजारो पत्रे कुठे तरी उपलब्ध असती, अगदी बाकी कुठे नाही तरी मोघलांच्या कागदपत्रांतुन, बादशहानाम्यातुन वगैरे, पण तसा काहीही उल्लेख नाही. आतापर्यंत सुजाण वाचकांना तेजोमहालय ही इमारत एका हिंदु राज्यकर्त्याची असून, त्या इमारतीचा बादशहा शहाजहान आणि त्याच्या बेगमेच्या प्रेमकथेशी सुतराम संबंध नाही हे बऱ्यापैकी लक्षात आले असावे. याआधी आपण मुघलकालीन अस्सल कागदपत्रे, समकालीन परदेशीय प्रवाशांच्या / वकिलांच्या नोंदी व जयपूर घराण्याकडे असलेले पुरावे ह्याचा संदर्भ पाहिला, आता आपण तेजोमहालयाची रचना कशी आहे त्याचा अभ्यास करुया. तेजोमहालयाची बांधणी ही वैदिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. तेजोमहालयाची मुख्य संगमरवरी इमारत अष्टकोनी आहे. भोलेनाथ शंकर हा कैलासपती असून त्याचे वास्तव्य सदोदीत हिमालयात असते, कदाचित म्हणूनच तेजोमहालय संपुर्णत: स्फटिकशुभ्र आहे. त्याची सध्याची इमारत पायापासून कळ्सापर्यंत प्राचीन शिवमंदिरच आहे आणी म्हणूनच ही इमारत मुसलमानी अमलाखाली जाऊन आज जवळ जवळ ३६५ वर्षे उलटुनही त्या मंदिराच्या पुर्वापार प्राचीन परंपरेनुसार संगमरवरी चौथऱ्यावर चढण्यापुर्वी आजही सामान्य प्रेक्षकाला आपले जोडे / चप्पल काढून ठेवावे लागतात. जर मुळातच ताजमहाल हा एक स्मशान / बेगमेची कबर म्हणून बांधला गेला असता, तर तिथे जाण्यासाठी आपले जोडे / चप्पल काढून जायची काहीच गरज नव्हती. याच लाल दगडी अंगणात चप्पल काढून संगमरवरी पायऱ्या चढून आपण चौथऱ्यावर येतो. इथे अंगणात आपल्या पावलांपुढेच एक चौरस शिळा आहे, त्या शिळेवर आपण जर पाय आपटुन पाहीले तर पोकळ आवाज येतो, त्याच्या बाजुच्या शिळेवर पाय आपटुन पाहिला तर तिथे पोकळ आवाज येत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पोकळ आवाज येतो, त्या ठिकाणी संगमरवरी चौथऱ्यावरुन आतील कक्षात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या चिणुन टाकुन तो रस्ता बंद करुन टाकण्यात आला असावा. त्या शिळेच्या जरा पुढे गेले की तिथला मुळ संगमरवर उपटुन त्याठिकाणी हलक्या प्रतीची फरशी लावलेली सहज नजरेत येते. कदाचित या ठिकाणी प्रवेशद्वाराकडे तोंड करुन असेलेल्या नंदीची स्थापना केलेली असावी. अष्टकोनी आकार हे वैदिक स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. हिंदु संस्कृतीत आठ या आकड्याला फार मोठे महत्व आहे. अष्टदिशा, अष्टदिक्पाल, अष्टावधानी माणुस, अष्टपैलु विद्वान, मराठेशाहीचे अष्टप्रधान, आठ सिद्धी, अष्टाध्यायी, साष्टांग नमस्कार, मंगलाष्टके, जपाच्या माळेचे १०८ मणी, अष्टधातुंचा कळस इ. तेजोमहालयाच्या परिसरात सर्व छत्रे अष्टकोनी आहेत, मुख्य इमारत अष्टकोनी असून, त्यातील गर्भगृह हे ही अष्टकोनीच आहे. त्यातील संगमरवरी जाळीचे कोंदणही अष्टकोनीच आहे. ताजमहालाच्या संगमरवरी चौथऱ्यावर चार कोपऱ्यांना चार स्तंभ आहेत, ज्यांना चार मिनार म्हणून संबोधतात. ताजमहाल हे जर एक स्मशान आहे, जर त्यात बेगमेचे थडगे आहे, तिचा मृतदेह पुरला आहे, तर अशा स्थळी चार काय एक सुद्धा मिनार नको. पुन्हा ह्या मिनारांची रचना / बांधकाम कसे आहे! आपण जेव्हा सत्यनारायणाची पुजा करतो, तेव्हा चौरंगाच्या चार कोपऱ्यांना चार केळीचे खांब उभे करतो, अगदी तशीच या चारही मिनारांची रचना आहे. कदाचित प्राचिन काळी या चारी मिनारांवर दिवे / मशाली लावून मंदिराची शोभा वाढवली जात असावी. तेजोमहालयावर पुर्ण कुंभाचा कळस आहे, त्यात वर शेंड्यावर नारळाचा आकार, त्याचे खाली दोन वाकलेली आंब्याची पाने व त्याची खाली कलश अशी ती रचना आहे. एका चंद्रकोरी दांड्यावर मधोमध कळस आहे. हा चंद्रकोरी दांडा म्हणजे भोलेनाथ शिवाच्या कपाळावर असलेल्या गंधातील आडवा पट्टा आहे. ह्या कळसाखाली असलेली चंद्रकोर सरळ आहे. तेंव्हा हे चिन्ह म्हणजे इस्लाम धर्माचा चाँदतारा आहे, असा समज कोणीही करुन घेऊ नये. ताजमहालाच्या चारही कमानीवर आडवे / उभे कुराण जडवलेले दगड बसवलेले आहेत, त्यांचे जर बारकाईने निरिक्षण केले तर एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे हे कुराणाच्या लिखावटीचे दगड सरळ सपाट नसून छोटी छोटी ठिगळे करुन लावलेले दिसतात, त्या शिवाय ह्या दगडांचा रंगही एकसारखा नाही. विविध छटांचे लहान मोठे संगमरवरी तुकडे चिकटवल्यासारखे वाटतात. कदाचित तेथे पुर्वी असलेल्या हिंदु मुर्ती, संस्कृत शिलालेख, किंवा शिवस्तुतीतील श्लोक कोरले असावेत, व ते सर्व उपटुन त्या ठिकाणच्या जागा भरुन काढण्यासाठी कुराण लिहिलेले तुकडे चिकटवले असावेत. जितकी मला मुसलमान धर्माबद्दल माहिती आहे, त्या प्रमाणे मुसलमान बांधव नमाजाच्या वेळी खाली फरशीवर बसून किंवा मक्केकडे तोंड करुन नमाज पढतात, त्यांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण-ए-शरीफ वाचतानाही कुणी मान वर करुन, आकाशाकडे / शिखराकडे पाहात किंवा थोड्या थोड्या तुकड्यांत जोडलेले कुराण नक्कीच वाचणार नाहीत. कोणत्याही धर्माचा माणुस असो, आपल्या इष्टदेवतेसमोर वाकूनच त्या देवतेची आराधना करेल ना? तेजोमहालयात जी शिवलिंगे होती त्या जागी मुमताझची कबरींची स्थापना झाली, पण शिवलिंगाभोवती प्रदक्षिणेसाठी केलेले पाच मार्ग मात्र तसेच राहीले. एक प्रदक्षिणा मार्ग सोन्याच्या कठड्याच्या बाहेरुन, दुसरा मार्ग संगमरवरी जाळीच्या बाहेरुन, तिसरी मार्ग म्हणजे अष्टकोनी गर्भगृहाच्या बाहेरुन, चौथा मार्ग संगमरवरी चौथऱ्यावरुन आणि पाचवा मार्ग म्हणजे लाल दगडाच्या अंगणातून. जयपूरचे कछवाह कुलोत्पन्न राजे हे शिवशंकराचे परमभक्त होते, शिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवदर्शनासाठी उसळणाऱ्या अलोट गर्दीसाठी ही अनोखी व्यवस्था केली गेली असावी. अष्टकोनी कक्षाच्या बाहेरुन फिरत असताना भिंतीवर संगमरवरात कोरलेले नक्षिकाम लक्षपुर्वक पाहीले तर त्यात फुलांना ’ॐ’ चा आकार असल्यासारखे वाटते. शिवाय कोरलेल्या रोपांच्या पानांचा आकार शंखाचा असल्यासारखे वाटते. संगमरवरी चौथऱ्यावर उभे राहुन तेजोमहालयाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर असलेल्या नक्षींकडे नीट निरखुन पाहिले तर नागनागिणींची अनेक युगुले एकमेकांवर फणा काढून टकामका पहात असल्यासारखे वाटते. ह्या नागनागिणींच्या नक्षीच्या बरोबर खाली असलेल्या संगमरवरावर घंटांची रांग जडवल्याप्रमाणे नक्षी आहे. गर्भगृहात संगमरवरी जाळ्यांचे अष्टकोनी कोरीव काम आहे, त्या कोरीव कामातील घुमटही बरोबर १०८ आहेत. मुमताझच्या कबरीजवळ उभे राहुन घुमटाच्या नक्षीवरुन नजर फिरवली तर त्या नक्षीत आधी अष्टदिशादर्शक आठ बाणांचे चिन्ह आहे, नंतर १६ नागांचे वर्तुळ, त्यानंतर ३२ त्रिशुळाकृतीचे वर्तुळ आणि त्याच्याही पलीकडे ६४ कमळांच्या कळ्यांचे वर्तुळ असे सुरेख कोरीव काम दिसते. कदाचीत या सगळ्या खुणा मिटवण्यासाठीच बादशहाने जयसिंगाकडुन संगमरवरी दगडाची मागणी केली असावी, आणि ती कदाचीत पुरवली गेली नसावी. तेजोमहालयाच्या बदामी रंगाच्या महिरपी कमानीच्या दारातुन आत शिरताना थोडे थांबुन आपल्या डाव्या-उजव्या हातास पाहिले तर घुमट असलेल्या नारिंगी रंगाच्या दगडानी बनवलेल्या इमारती दिसतात. ह्या इमारती राजा जयसिंग, राजा मानसिंग यांचे वाडे आहेत. खरंतर कधी काळी संपुर्ण आग्रा शहरच जयपूर घराण्याच्या मालकीचे होते, पण ते १६३१ साली त्यांच्याकडुन हिरावले गेले, आणि जयपूर खानदानाचे वाडे तेवढे कोटाच्या बाहेरच्या बाजुस राहीले. कोणत्याही ठिकाणच्या नारिंगी, बदामी, भगव्या रंगांच्या इमारती इस्लामी राजकारण्यांच्या असूच शकत नाहीत, पण भारतातील बहुतेक ऐतिहासिक इमारती ह्याच रंगांच्या आहेत. इमारती ह्या रंगांच्या आहेत, म्हणजे त्यांना बांधायला लागणारा दगडपण कुठेतरी जवळपासच असला पाहिजे असा विचार सगळ्यांच्या मनात येणारच, एखादी गोष्ट जवळच कुठेतरी मुबलक प्रमाणात असली की ती मुक्तहस्ते वापरात आणता येते असा आपला सर्व सामान्यांचा समज आणि अनुभव, पण तेजोमहालयाच्या बांधकामाच्या बाबतीत मात्र हा समज एकदम खोटा ठरतो. भारताची भौगोलिक रचना पाहिली तर आग्रा, दिल्ली, घोलपुर, ग्वाल्हेर, झाशी, फत्तेपुरसिक्री, ओसच्छा, दतिया, भरतपुर या ठिकाणी नारिंगी, बदामी रंगाच्या दगडाचा वापर विस्तृत प्रमाणात केला गेला आहे, पण तिथली माती / जमीन विशेषत: ज्या जमिनीवर सामान्य जनतेचे वाडेहुडे, दुमजली, तीनमजली महाल बांधले आहेत, त्याच्या पायाखालचे दगड नारिंगी / बदामी / भगव्या रंगाचे अजिबात नाही आहेत. ह्याचाच अर्थ असा की भारतीय वैदिक पद्धतीचे बांधकाम करण्यासाठी हिंदु संस्कृतीचा जो केशरी / नारिंगी / बदामी रंगाचे फत्तर दूरदूरच्या खाणींमधुन आणवून पांडवांपासून पृथ्विराजापर्यंत हिंदु सम्राटांनी विपुल महाल, वाडे, किल्ले यांची रचना केली. उर्वरीत भाग उद्या.... संदर्भ :- medhakanitkar blog

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी