17 चक्रवर्ती
सर्वांच्या डोक्यात नेहमीच विचारांचा कमी जास्त प्रमाणात कल्लोळ असतो .ज्याच्या त्याच्या लहानपणापासूनच्या परिस्थितीनुसार अनेक संस्कार होत असतात .त्या संस्कारानुसार काही बाह्य विचार दृश्य इत्यादींच्या आघातामुळे किंवा मनातल्या मनात काही संवेदामुळे विचारचक्र निर्माण होते .आपले मन हे कमी जास्त ताण असलेला कमी जास्त आकार असलेला कमी जास्त जाडी असलेला कमी जास्त उंचवटे असलेला व निरनिराळ्या पदार्थापासून बनवलेलाएक पडदा आहे अशी कल्पना केली तर त्यावर होणाऱ्या बाह्य आघातानुसार निरनिराळ्या मनातून निरनिराळे ध्वनी निर्माण होतील .आघात जरी एकाच प्रकारचा असला तरी ध्वनी मात्र निरनिराळे असतील .मनाचेही तसेच आहे निरनिराळ्या मनातून निरनिराळे तरंग निर्माण होतात .मन नेहमी भूतांवर आधारित भविष्याकडे व पुन: भविष्यातून भूतकाळाकडे असे संचार करीत असते. बोलताना या विचारांवर मनाच्याच एका भागाचे ज्याला आपण कदाचित बुद्धी म्हणू त्याचे नियंत्रण असते .प्रत्येकांमध्ये हे नियंत्रण कमी जास्त प्रमाणात असते तर क्वचित हे नियंत्रण जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालेले असते .अशा वेळी काय बोलावे काय बोलू नये याचे भान बर्याच मंडळीना रहात नाही .या अर्थाने आपल्यापैकी प्रत्येक जण चक्रवर्ती आहे .प्रत्येकाच्या डोक्यात निरनिराळ्या वेळी निरनिराळी चक्रे फिरत असतात. यापैकी अापण इतरांजवळ काय बोलावयाचे व काय बोलावयाचे नाही हे बरेच जण ठरवू शकतात, परंतु काही जण भडाभडा डोक्यातील विचार बाहेर टाकत असतात. इतरांना त्यामध्ये रस आहे की नाही याचा त्यांना पत्ताच नसतो.स्वाभाविकपणे अश्या लोकांचा सहवास टाळण्याचा बरेच जण प्रयत्न करतात