Get it on Google Play
Download on the App Store

मी आणि श्रावणसरी

स्मिता गणेश परदेशी
तासगाव

मी आणि श्रावणसरी
सारख्याच तर असतो...
स्वतःतच मग्न होऊन
हव्या तशा बरसतो....

कधी सोनपावलानी
अलगद रिमझिमतो
कधी तडमताशासारख्या
नखशिखांत गरजतो

कधी हवीहवीशी
उबदार चामरं ढाळतो
तर कधी घनउदासी
मनी लेऊन झाकोळतो

मी आणि श्रावणसरी
सारख्याच तर असतो
ऊनपावसाच्या खेळात
आपलच मन रिझवतो

श्रावणसरीचा लहरीपणा
निसर्गदत्तच असतो
चाळिशीत तो माझ्या
अंतरी अलगद उतरतो.....