Android app on Google Play

 

श्रावण सरींची बरसात

 

उदय सुधाकर जडिये
पिंपरी, पुणे
मोबाईल: ९५५२६२६४९६

श्रावण सरींत भिजण्याची
मजा काही औरच असते.
जसे गरमा गरम वरण भात
वर साजूक तुपाची धार असते.

धुंद बरसात अन् मातीच्या सुगंधाची
मजा काही औरच असते.
जसे खरपूस भाकर अन् मिरचीचा ठेचा
वर लिंबू अन् तेलाची धार असते.