Get it on Google Play
Download on the App Store

स्वर्गातील माळ 2

एके दिवशी हिरी, माणकी व रुपी अगदी कामाच्या गर्दीत होत्या. कोणते होते काम? त्या तिघी बहिणी काही तरी बांधीत होत्या. काही वस्तू कोणाला पाठवीत होत्या. वस्तू बांधता बांधता त्या एकमेकींशी बोलत होत्या.

हिरी म्हणाली, 'माझी देणगी देवाला आवडेल. शाळेत जे पुस्तक मला बक्षीस मिळाले, ते मी माझ्या एका मैत्रिणीस पाठवीत आहे. स्वत:चं बक्षीस कोणी दुसर्‍यास देतो का? परंतु मी ते देत आहे.'

माणकी म्हणाली, 'माझ्या वाढदिवशी बाबांनी जे सुंदर रेशमी पातळ मला दिलं, ते मी भेट म्हणून मैत्रिणीस पाठवीत आहे. देवाला माझी देणगी आवडेल.'

रूपी म्हणाली, 'मी माझी सुंदर बाहुली इंदापूरच्या मैत्रिणीस पाठवीत आहे. त्या बाहुलीवर माझा जीव की प्राण. तिला मी किती दागिने केले, किती तिला नटविली! परंतु अशी ती बाहुली मी आज पाठवीत आहे.'

सखू त्या बहिणींना मदत करीत होती. ती त्या वस्तू नीट बांधीत होती. त्या वस्तू का पाठवायच्या तिला कळेना. तिच्याने राहवेना. तिने शेवटी विचारले,
'तुम्ही आज हया वस्तू का पाठविता? सांगा ना हिराताई.'

'अग, आता दोन दिवसांनी दिवाळी येणार. दिवाळीच्या दिवशी आकाशातून माळ येणार. स्वर्गातील फुलांची माळ. देवाच्या घरची माळ! ज्याची देणगी देवाला आवडेल, त्याच्या गळयात ती माळ पडेल. सार्‍या गावात बातमी पसरली आहे. गेली बारा वर्षं माळी आली नाही. पूर्वी येत असे. यंदा पुन्हा येणार असं म्हणतात. म्हणून गावातील लहान-थोर सारी देणग्या देत आहेत. प्रत्येकाला वाटतं आहे की, ती माळ स्वत:च्या गळयात पडावी. सखू, तू कोणती देणगी देणार?' हिरीने हसून विचारले.

सखू म्हणाली, 'मी कोणती देणार देणगी? माझ्याजवळ काय आहे देण्यासारखं? ना पातळ, ना खण; ना खेळणं, ना पुस्तक. माझी आई गरीब आहे. आम्ही काय देणार? तुमच्या गळयात माळ पडली तर त्यातच माझा आनंद. ज्या घरी मी कामाला जाते, त्या घरात माळ आली, तर ती मला मिळाल्यासारखीच आहे. अशा पुण्यवंताच्या घरी मला काम करायला मिळालं असं मनात येऊन मी आनंदानं नाचेन; अधिकच नेटानं तुमचं काम करीन. झालं ना हे नीट बांधून?'

घामाची फुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वर्गातील माळ 1 स्वर्गातील माळ 2 स्वर्गातील माळ 3 स्वर्गातील माळ 4 स्वर्गातील माळ 5 स्वर्गातील माळ 6 स्वर्गातील माळ 7 स्वर्गातील माळ 8 स्वर्गातील माळ 9 जाई 1 जाई 2 जाई 3 जाई 4 जाई 5 जाई 6 जाई 7 जाई 8 जाई 9 जाई 10 जाई 11 बासरीवाला 1 बासरीवाला 2 बासरीवाला 3 बासरीवाला 4 बासरीवाला 5 बासरीवाला 6 बासरीवाला 7 अश्रूंचे तळे 1 अश्रूंचे तळे 2 अश्रूंचे तळे 3 अश्रूंचे तळे 4 अश्रूंचे तळे 5 ज्याचा भाव त्याचा देव 1 ज्याचा भाव त्याचा देव 2 ज्याचा भाव त्याचा देव 3 ज्याचा भाव त्याचा देव 4 ज्याचा भाव त्याचा देव 5 ज्याचा भाव त्याचा देव 6 ज्याचा भाव त्याचा देव 7 थोर त्याग 1 थोर त्याग 2 थोर त्याग 3 थोर त्याग 4 थोर त्याग 5 मातृभक्ती 1 मातृभक्ती 2 मातृभक्ती 3 मातृभक्ती 4 मातृभक्ती 5 मातृभक्ती 6 मातृभक्ती 7 बहुला गाय 1 बहुला गाय 2 बहुला गाय 3 बहुला गाय 4 बहुला गाय 5 बहुला गाय 6 घामाची फुले 1 घामाची फुले 2 घामाची फुले 3 घामाची फुले 4