रुद्राक्षाची वैशिष्ट्ये
१. जड (वजनदार) आणि
सतेज
२. मुखे स्पष्ट
असलेला
३. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक इत्यादी शुभचिन्हे असलेला
४. मोठ्यात मोठा
रुद्राक्ष आणि लहानात लहान शाळीग्राम उत्तम. (मेरुतंत्र)
५. कवेत मावणार नाही,
एवढा बुंधा असलेल्या म्हणजे जुन्या झाडाचा
रुद्राक्ष
६. समुद्रसपाटीपासून
अधिक उंचीवर असलेल्या झाडाचा रुद्राक्ष आणि एकाच झाडाच्या वरच्या फांद्यांतील
रुद्राक्ष : उंचीवरच्या रुद्राक्षांना वरून येणारे सत्त्वगुण अधिक प्रमाणात मिळतात;
म्हणून ते अधिक प्रभावशाली असतात.
७. पांढर्या रंगाचा
सर्वांत चांगला. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिव आणि काळा रंग असल असतात. पांढरे आणि पिवळे
रुद्राक्ष सहसा आढळत नाही