श्रीकृष्ण अवतार
द्वापारयुगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार घेऊन अधर्मिंचा विनाश केला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. त्यांच्या मातेचे नाव देवकी आणि पित्याचे नाव वसुदेव होते. भगवान श्रीकृष्णांनी या अवतारात अनेक चमत्कार केले आणि दुष्टांचा विनाश केला.
कंसाचा वध देखील श्रीकृष्णांनी केला. महाभारताच्या युद्धात अर्जुनाचे सारथी बनले आणि विश्वाला गीतेचे ज्ञान दिले. धर्मराज युधिष्ठिराला राजा बनवून धर्माची स्थापना केली. भगवंतांचा हा अवतार सर्व अवतारांत सर्वश्रेष्ठ मानला जातो.