Android app on Google Play

 

दत्तात्रेय अवतार

 


 धर्म ग्रंथांनुसार दत्तात्रेय देखील भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांच्या उत्पत्तीची कथा अशी आहे – एकदा माता लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांना आपल्या पातीव्रत्यावर अत्यंत गर्व झाला. भगवंतांनी त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी लीला रचली. त्याच्या अनुसार एक दिवस नारद मुनी फिरत फिरत देवलोकात गेले आणि तीनही देवींना आळी पाळीने जाऊन सांगितले की ऋषी अत्रि यांची पत्नी अनुसूया हिच्या समोर तुमचे पातिव्रत्य काहीच नाहीये. तिन्ही देवींनी ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली आणि त्यांना सांगितले की त्यांनी अनुसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घ्यावी. तेव्हा भगवान शंकर, विष्णू आणि ब्रम्हदेव साधू वेशात अत्रि मुनींच्या आश्रमात गेले. महर्षी अत्रि त्यावेळी आश्रमात नव्हते. तिघांनी देवी अनुसूयेकडे भिक्षा मागितली आणि असेही सांगितले की तुला विवस्त्र होऊन आम्हाला भिक्षा द्यावी लागेल. अनुसूया आधी तर हे ऐकून चमकली, पण पुन्हा साधूंचा अपमान होऊ नये यासाठी तिने आपल्या पतीचे स्मरण केले आणि म्हटले की , जर माझा पतिव्रता धर्म सत्य असेल तर हे तीनही साधू सहा सहा महिन्यांचे बालक होऊदेत. असे बोलताच त्रिदेव सहा सहा महिन्यांचे बालक होऊन रडू लागले. तेव्हा अनुसूयेने माता बनून त्यांना कुशीत घेऊन स्तनपान करवले आणि पाळण्यात घालून जोजवले. जेव्हा तीनही देव आपल्या स्थानी परत गेले नाहीत तेव्हा तीनही देवी व्याकूळ झाल्या. तेव्हा नारदाने तिथे येऊन सारा वृत्तांत सांगितला. तिन्ही देवी अनुसुयाकडे गेल्या आणि तिची क्षमा मागितली. तेव्हा मग अनुसूयेने तीनही देवांना आपल्या पूर्व रुपात आणले. प्रसन्न होऊन त्रिदेवानी तिला वरदान दिले की आम्ही तिघेही आपल्या अंशाने तुझ्या गर्भातून पुत्र म्हणून जन्म घेऊ. तेव्हा ब्रम्हाच्या अंशाने चंद्रमा, शंकराचे अंशाने दुर्वास, आणि विष्णूच्या अंशाने दत्तात्रेयाचा जन्म झाला.