Android app on Google Play

 

श्रीहरि अवतार

 



धर्म ग्रंथांनुसार प्राचीन काळात त्रिकुट नावाच्या पर्वताच्या खोऱ्यात एक शक्तिशाली गजेंद्र आपल्या हत्तीणींसोबत राहत होता. एकदा तो आपल्या हत्तीणींसोबत एका तलावात स्नान करायला गेला. तिथे एका मगरीने त्याचा पाय पकडला आणि त्याला पाण्याच्या आत खेचू लागली. गजेंद्र आणि मगरीचा संघर्ष एक हजार वर्षांपर्यंत चालू राहिला. शेवटी गजेंद्र शिथिल पडला आणि त्याने श्रीहारींचा धावा केला. गजेंद्राची स्तुती ऐकून भगवान श्रीहरी प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या चक्राने मगरीचा वध केला. भगवान श्रीहारींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपला सेवक बनवले.