Android app on Google Play

 

भगवान ऋषभदेव

 


भगवान विष्णूनी ऋषभदेव या रुपात आठवा अवतार घेतला. धर्म ग्रंथांनुसार महाराज नाभीला कोणतेही संतान नव्हते. त्यामुळे त्याने आपली पत्नी मेरुदेवी हिच्यासोबत पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञामुळे प्रसन्न होऊन स्वतः भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी महाराज नाभीला सांगितले की मीच तुझ्याकडे पुत्र म्हणून जन्माला येईन.
वरदाना प्रमाणे काही काळानंतर भगवान विष्णू महाराज नाभीकडे पुत्राच्या रुपात जन्मले. पुत्राचे अत्यंत सुंदर, सुदृढ शरीर, कीर्ती, तेज, बळ, ऐश्वर्य, यश, पराक्रम आणि वीरता हे गुण पाहून महाराज नाभीने त्याचे नाव ऋषभ (श्रेष्ठ) ठेवले.