Get it on Google Play
Download on the App Store

आदिराज पृथु


भगवान विष्णूंच्या एका अवताराचे नाव आदिराज पृथु आहे. धर्म ग्रंथांनुसार स्वयंभू मनूच्या वंशात अंग नावाच्या प्रजापतीचा विवाह मृत्यूची मानस कन्या सुनिता हिच्याशी झाला होता. त्यांना वेन नावाचा पुत्र झाला. त्याने देवाला मानले नाही आणि स्वतःची पूजा करण्यास सांगितले.
तेव्हा ऋषींनी मंत्रांच्या शक्तीने त्याचा वध केला. नंतर ऋषींनी पुत्रहीन राजा वेन याच्या हातांचे मंथन केले, ज्यामधून पृथु नामक पुत्र उत्पन्न झाला. पृथूच्या उजव्या हातात चक्र आणि पायाजवळ कमळाचे चिन्ह बघून ऋषींनी सांगितले की स्वतः श्रीहारींचा अंश अवतरला आहे.