Android app on Google Play

 

वामन अवतार

 

सतयुगात प्रल्हादाचा पुत्र दैत्यराज बळीने स्वर्गावर अधिकार प्राप्त केला. सर्व देवता या आपत्तीपासून वाचण्यासाठी भगवान विष्णूंकडे गेले. तेव्हा भगवान विष्णूनी सांगितले की मी स्वतः देवमाता अदितीच्या गर्भातून उत्पन्न होऊन तुम्हाला स्वर्गाचे राज्य परत मिळवून देईन. काही काळानंतर भगवान विष्णूनी वामन अवतार घेतला.
एकदा बळी महान यज्ञ करत होता, तेव्हा भगवान वामन बळीच्या यज्ञशाळेत गेले आणि त्याच्याकडे तीन पग (पाऊल) धरती दान मागितली. राजा बळीचे गुरु शुक्राचार्य यांना ही लीला लक्षात आली आणि त्यांनी बळीला दान देण्याला मनाई केली. परंतु बळीने तरीही भगवान वामनाला तीन पग धरती दान देण्याचा संकल्प केला. भगवान वामनने विराट रूप धारण केले आणि एक पाऊल धरतीवर आणि दुसरे पाऊल स्वर्गात ठेवले. तिसरे पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे बळीने भगवान वामनाला आपल्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितले. बळीच्या डोक्यावर पाय ठेवल्याने तो सुतललोकात जाऊन पोचला. बळीची दानशूरता बघून भगवानने त्याला सुतललोकाचा राजा बनवले. भगवान वामनाने देवांचे सहाय्य करून त्यांना स्वर्ग परत दिला.