हयग्रीव अवतार
धर्म ग्रंथांनुसार एकदा मधु आणि कैटभ नावाचे २ शक्तिशाली राक्षस ब्रम्हदेवाकडून वेद चोरून रसातलात गेले. वेद चोरीला गेल्यामुळे ब्रम्हदेव अत्यंत दुःखी झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले. तेव्हा भगवंतांनी हयग्रीव अवतार घेतला. या अवतारात भगवान विष्णुंची मान आणि तोंड घोड्यासारखे होते. तेव्हा भगवान हयग्रीव रसातलात गेले आणि मधु आणि कैटभ यांचा वध करून वेद ब्रम्हदेवाला परत आणून दिले.