Android app on Google Play

 

नारद अवतार

 


-
धर्म ग्रंथांनुसार देवर्षी नारद हे देखील भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. शास्त्रांनुसार नारद मुनी हे ब्रम्हदेवाच्या ७ मानस पुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी कठीण तपश्चर्या करून देवर्षी हे पद प्राप्त केले आहे. त्यांना भगवान विष्णूंच्या परम भक्तांपैकी एक मानले जाते. देवर्षी नारद धर्माचा प्रचार आणि लोक कल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. शास्त्रांमध्ये देवर्षी नारद यांना भगवंतांचे मन असेही म्हटलेले आहे. श्रीमद भागवत गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या २६ व्या श्लोकात स्वतः भगवान श्रीकृष्णांनी यांची महती स्वीकार करून म्हटले आहे - देवर्षीणाम्चनारद: - म्हणजेच देवर्षींमध्ये मी नारद आहे.