Android app on Google Play

 

महर्षि वेदव्यास

 


पुराणात महर्षी वेदव्यास यांना देखील विष्णूचाच अवतार मानले गेले आहे. भगवान व्यास नारायणाचे कलावतार होते. ते महाज्ञानी महर्षी पराशर यांच्या पुत्राच्या रुपात प्रकट झाले. त्यांच्या जन्म कैवर्तराज याची पौष्यपुत्री सत्यवती हिच्या गर्भातून यमुनेच्या द्वीपावर झाला होता. त्यांच्या शरीराचा रंग काळा होता. त्यामुळे त्यांचे नाव कृष्णद्वैपायन देखील पडले होते. यांनीच मनुष्याची आयुर्मर्यादा आणि शक्ती यांना अनुसरून वेदांचे विभाजन केले. म्हणूनच त्यांना वेदव्यास असे म्हटले जाते. यांनीच महाभारत या महान ग्रंथाची रचना केली होती.