Android app on Google Play

 

श्री सनकादी मुनी

 धर्म ग्रंथांनुसार सृष्टीच्या आरंभी लोक पितामह ब्रम्हदेवाने अनेक लोकांची रचना करण्याच्या इच्छेने घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तप अर्थाच्या सन नावाने युक्त होऊन सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार नावाच्या ४ ऋषींच्या रूपाने अवतार घेतला. हे चौघे प्रकट झाल्यापासूनच मोक्ष मार्ग परायण, ध्यानात मग्न राहणारे, नित्य सिद्ध आणि नित्य विरक्त असे होते. हे भगवान विष्णूंचे सर्वप्रथम अवतार मानले जातात.