Get it on Google Play
Download on the App Store

गेराल्ड जॅक्सन


विएतनामहुन परतलेला सैनिक असणारा गैराल्ड जॅक्सनची १९७२ मध्ये कोणीतरी जवळपास ५० चाकुचे वार करून हत्या केली. त्याच्या कारमधला रेडिओ चोरी झाला होता आणि त्याचं घरसुद्धा अस्ताव्यस्त होतं.  ३८ वर्षांनंतर गब्रिएल्ले  विमर सॅन डिएगो पोलिस विभागात प्रशिक्षण मिळवणारा एक इंटर्न थंड झालेल्या प्रकरणांच्या फाईली पहात होता आणि त्याची नजर जॅक्सनच्या फाईलवर गेली. जेव्हा त्याने फाईलमधले फिंगरप्रींट्स पाहिले तेव्हा त्याने ते लगेच एफ. बी. आय. कडे पाठवले. याच्या तिन महिन्यानंतर एफ. बी. आय. ला त्यांचा मेल मिळाला. ६० वर्षांच्या गेराल्ड मेटकाल्फला २००८ मध्ये टेक्सासला अटक करण्यात आली.  त्याने २०१० मध्ये स्वतःचा गुन्हा कबुल केला.  न्यू जर्सीची सर्वात जास्त काळ चाललेली केस शेवटी आरोपी सापडल्याने संपली.