Get it on Google Play
Download on the App Store

जेसिका लीन कीन

१९९१ मध्ये जेसिका लीन कीन उच्च विद्यापीठाची एक अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थिनी होती जिला संगीतात आवड होती. ती कोलंबस मध्ये समुपदेशन आणि तरूणांसाठी असलेल्या घरात रहायची.  १५ मार्च ला ती बसची वाट बघत असताना तिचं कोणीतरी अपहरण केलं आणि जवळच्या कब्रस्तानात घेऊन गेले. तिच्या अपहरणकर्त्याने तिला ३० किलोच्या एका कब्रदगडाने मारून टाकलं. दोन दिवसांनंतर तिचं शव मिळालं. ही केस बाजुला पडली पण १८ वर्षांनंतर राज्याने एक असा कायदा लागू केला ज्यात हिंसक गुन्हे करणाऱ्या सर्व  आरोप्यांच्या डी.एन.. चे नमुने मागितले गेले. कैदी मार्विन ली स्मिथ, ज्याला कोलंबसमध्ये आणखी दोन खुनांसाठी अटक केली होती, त्याचे नमुने घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांशी जुळले आणि पोलिसांनी त्याला दोषी जाहिर केलं.  २७ फेब्रुवारी २००९ ला स्मिथने आपला गुन्हा कबुल केला आणि त्याला ३० वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला.