Android app on Google Play

 

रोबर्ट पीटरसन, अन्तोन स्चुएस्स्लेर आणि जौन स्चुएस्स्लेर

 


ऑक्टोबर १९५५ मध्ये तीन मुलांचे - जौन स्चुएस्स्लेर १३, त्याचा भाऊ अन्तोन ११ आणि रॉबर्ट पीटरसन यांचे नग्नावस्थेतील शव कुक काईंटी फॉरेस्ट प्रेसेर्वमध्ये सापडले. या मुलांना गळा दाबुन मारण्याच्या आधी त्यांचं लैंगिक शोषण झालं होतं.  ३९ वर्षांनी १९९४ मध्ये केनेथ हनसेन ला जाळपोळीच्या संशयाखाली अटक झाली. वकिलांनी, त्यावेळी हंसेन २२ वर्षांचा होता व तो या तीन मुलांना जंगलात आपली घृणास्पद कामं करायला घेऊन गेला होता असे पुरावे देऊ करेपर्यंत हंसेन ला १९५५ च्या खुनांसाठी १९९५ पर्यंत दोषी मानलं गेलं नव्हतं. गोष्ट इथेच संपली नाही. हंसेनला शिक्षा झाल्यावर पाच वर्षांनी त्याची शिक्षा रद्दही झाली कारणतो gay आहे आणि नेहमीच किशोरवयीन मुलांच्या शोधात असतोया साक्षीला अवाजवी ठरवण्यात आलं. त्याच वर्षी दुसऱ्यांदा हा खटला भरला आणि २ तासांच्या वादानंतर दुसऱ्या ज्युरी ने पुन्हा एकदा त्याला दोषी ठरवलं. त्याला ३०० वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला. हंसेनचा २००७ मध्ये जेलमध्येच मृत्यू झाला. अनेक लोकांना वाटत होतं की २ वेळा दोषी ठरलेला आरोपीच खरी गुन्हेगार असेल. बचावपक्षाकडे अजुन एका माणसाची साक्ष होती, तीही ग्राह्य धरण्यात आली नाही.