Android app on Google Play

 

डेनिस पिएर्निच्क

 

साल्ट लेक सिटीत डेनिस पिएर्निच्क  नावाच्या एका gay माणसाचा १९८३ मध्ये खून झाला ज्यामुळे संपूर्ण शहर भयभीत झालं होतं. पण जेव्हा तो त्याच्या घरात डोक्यावर आणि छातीवर अनेक जखमांसकट मृत सापडला तेव्हा पोलिस बुचकळ्यात पडले. कारण त्या पारंपारिक शहरात स्वतःला gay म्हणून सांगणं जीवघेणं होतं आणि याचमुळे बरेच साक्षीदार समोर यायला तयार नव्हते.

पण जेव्हा २०११ मध्ये या केसला एका नव्या डिटेक्टीव्हकडे सोपवण्यात आलं तेव्हा असं समजलं की लोकं आता बोलायला तयार आहेत. तपास रॉडनी वन कॉमेन नावाच्या एका व्यक्तीवर येऊन थांबला आणि पुरावे इतके ठोस होते की त्याला अटक झालीच असती पण दुर्दैवाने वन कॉमेनचा २००५ मध्ये एका कार दुर्घटनेत मृत्यू झाला.