लुसी जॉनसन
सप्टेंबर १९६२ ला एका मुलाची आई असणारी ,२५ वर्षांची लुसी जॉनसन आपल्या ब्रिटीश कोलंबिया, सूरीच्या गरी होती. पुढच्या दिवशी ती दिसली नाही. त्याच्याही पुढच्या दिवशी आणि पुढच्या ५२ वर्षांपर्यंत ती दिसली नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी चार वर्षांनंतरही लुसी गायब झाली आहे हे मानलं गेलं नाही. सहाजिकंच यातुन काही प्रश्न उपस्थित झाले आणि संशयाची सुई तिचा नवरा मार्विनकडे वळली. पोलिसांनी त्याच्या घराचं मागचं आंगण शव सापडेल या आशेने खोदलं पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. दशकं उलटली, मार्विनंही मेला, आता केस सुटण्याची कोणतीही आशा उरली नव्हती. एक व्यक्ती होती जिला अजूनही आशा होती ती म्हणजे लुसीची मुलगी लिंडा जी तिची आई गायब झाली तेव्हा फार लहान होती. पुराव्याच्या आशेत लिंडाने सुरीच्या पोलिसांच्या मदतीने वर्तमानपत्रात आणि इतर मिडीयात जाहिराती दिल्या. नंतर २०१३ मध्ये लिंडाला एक फोन आला जो तिच्या सावत्र बहिणीचा होता आणि जिच्या अस्तित्त्वाबद्दल लिंडाला काहीच कल्पना नव्हती. तिने लिंडाला सांगितलं की तिची आई लुसी ही जिवंत आहे आणि युकोनमध्ये एका नव्या कुटुंबाबरोबर रहाते आहे.
हा दावा किती विश्वासार्ह होता हे जाणुन घेण्यासाठी लिंडाने या पुराव्याला पडताळुन पाहिलं. तिला कळलं कि तिच्या आईबरोबर कोणतीही दुर्घटना झाली नव्हती. ती स्वतःच एका नविन आयुष्याकडे निघाली होती. लुसीच्या सांगण्यानुसार मार्विन तिच्याशी नीट वागत नव्हता आणि जेव्हा लुसी तिच्या मुलीला घेऊन तिथून निघत होती तेव्हा मार्विनने तिला जाऊ दिलं नाही. त्यामुळे ती एकटीच निघाली.