Get it on Google Play
Download on the App Store

मार्था जीन लैबर्ट

 २७ नोव्हेंबर १९८५ ला बारा वर्षांची मार्था जीन लैबर्ट आपल्या संत एगस्टीन, फ्लेरिडाच्या घरापासुन गायब झाली होती. सातव्या इयत्तेत शिकणारी मार्था परत कधीच दिसली नाही. कुठलंच शव, पुरावा किंवा संशय नसल्याने सेंट जॉन्स काऊंटी शेरिफ विभागाची लोकं या अपहरणामुळे काळजीत पडली. पुढच्या २५ वर्षांपर्यंत ही केस एक रहस्यच राहिली. शेवटी डिटेक्टीव्ह सी. एम. टिके आणि होवार्ड स्किप कोल ने या केसचा पुन्हा एकदा तपास करायला सुरूवात केली. मार्थाच्या जुन्या घराची झडती घेऊन झाल्यावर, आणि तिच्या मित्र-मेत्रिणी आणि नातेवाईकांशी बोलणं झाल्यावर डिटेक्टीव्ह ने गायब असलेल्या मुलीच्या भावावर, जो तिच्याहुन २ वर्षे मोठा होता, नजर फिरवली. डिटेक्टीव्ह टिके ने मोठ्या हुशारीने डेव्हिड लैबर्ट ( जो आत ३० वर्षांचा होता ) समोर मुलीचा फोटो ठेवुन चोकशी सुरी केली. २० तासांच्या चोकशीनंतर जे सत्य समोर आलं ते अतिशय भयानक होतं. १९८५ च्या एका रात्री मार्था आणि तिचा भाऊ डेव्हिड फ्लोरिडा मेमोरिअल कॉलेजच्या इमारतीत खेळत होते. हे ते नेहमीच करायचे. डेव्हिड ने मार्थाला दुकानात जायला पैसे दिले आणि तिने अजुन पैसे मागितल्यावर तिला एक बुक्का मारला. रागात त्याने आपल्या बहिणीला धक्का दिला ज्यामुळे ती मागच्या एका बाहेर आलेल्या सळीवर पडली आणि ती सळी तिच्या आरपार निघाली. घाबरून त्याने तिला तिथेच पुरलं आणि वीस वर्षांपर्यंत हे रहस्य स्वतःत कोंडुन ठेवलं. आपल्या मर्यादांमुळे आणि इतर काही कारणांमुळे पोलिसांनी डेव्हिडला अटक केली नाही. त्या भागात होणाऱ्या बांधकामांमुळे तिचे अवशेष कधीच सापडले नाहीत. याचमुळे डेव्हिडने सांगितलेली कहाणी खरी होती की खोटी हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही.