एमी वेईदनेर
१६ वर्षांच्या एमी वेईदनेरचं शव तिच्या इंडिआना पोलिस च्या घरी सापडलं होतं. त्यांना खूप वाईट तर्हेने मारलं होतं आणि बलात्कार करून, गळा दाबून त्यांचा खून केला होता. त्या रात्री त्या घरी आपल्या आजारी असलेल्या छोट्या बहिणीची काळजी घेत होत्या. घरात चोरीही झाली होती आणि त्यांचा भाऊ जॉन पॉल याचा स्टिरीओ सुद्धा गायब झाला होता. काहीच पुरावे न मिळाल्यामुळे (कारण एकच खुनी हात होता जो त्या काळी काहीच कामाचा नव्हता. ) ही केस कित्येक वर्ष धुळीत पडून होती. शेवटी आय. एम. पी. डी. चे अधिकारी बिल कार्टरला या केसमध्ये रस वाटला जेव्हा त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना या मुलीच्या आठवणीत फेसबुकवर एक पेज लाईक करायला सांगितलं. एकदा बिल या मुलीच्या परिवाराशी बोलला तेव्हा त्याला जाणवलं की त्यांनी आशाच सोडल्या आहेत. तेव्हा त्याने शपथ घेतली कि तो या क्रुर खुनाच्या रहस्याचा फडशा पाडेल. एक व्यक्ती जो या कुटुंबाला आणि या केसला चांगलं ओळखत होता, त्याने कार्टरला काही नावांची यादी दिली ज्यांच्याशी कार्टरला बोलायचं होतं. एक होता जॉन पॉल वेईदनेर चा मित्र रॉडनी डंक जो खून झाला तेव्हा १८ वर्षांचा होता. जेव्हा डंक कार्टरला भेटायला गेला नाही तेव्हा कार्टरने त्याच्या बोटांचे निशाण मिळवले आणि ते त्या खूनी पंज्याशी जुळवून पाहिले. ते दोन्ही निशाण एकदम अचूक होते. डंक इंडिआना पोलिसच्या पुर्वेले एका मित्राकडे सापडला. आपला गुन्हा सर्वांसमोर उघडकीस आला हे पाहुन त्याने आपल्या हाताची नस कापुन घेतली. त्याचा हा आत्महत्येचा प्रयत्न वाया गेला आणि त्याला दुष्कृत्यासाठी ६५ वर्षांची शिक्षा झाली. शिक्षेच्या दिवशी एमीच्या आईने न्यायालयासमोर प्रसारमाध्यमांना सांगितलं की- “मला वाटलं मी एखाद्या भक्षकाला बघेन पण ज्याला मी पाहिलं तो रॉडनी होता. २३ वर्ष ७ महिने आणि एक दिवस आम्ही हाच विचार करत राहिलो कि घरात कोणीतरी अनोळखी व्यक्ती घुसली होती ”