Get it on Google Play
Download on the App Store

मारिया रिदुल्फ


सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खटल्यांमध्ये अगदी वरती नाव आहे १९५७ मध्ये सात वर्षाची मुलगी मारिया रिदुल्फ हिच्या खुनाचा. ती मुलगी साईकामोर, इलेनॉईसच्याच्या थंडीच्या एका रात्री गायब झाली होती आणि पुढच्या वर्षी तिचं शव सापडलं होतं. एकजॉन तेस्सिअर- नावाचा संशयी सापडला होता पण त्याच्याकडे एक ठोस कारण होतं – ‘तो त्यावेळी ट्रेनने प्रवास करत होता.’ आणि या गोष्टीला दुजोरा देणारे साक्षीदारही होते. पोलिसांनी त्याला सोडलं आणि ती भयानक केस तशीच राहिली.

पण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे विज्ञानाकडे वेगळे मार्ग असतात. जेव्हा रिदुल्फच्या बॉडीला २०११ मध्ये परत एकदा डी. एन. . च्या चाचणीसाठी बाहेर काढण्यात आलं तेव्हा सुई परत तेस्सिएर  कडे फिरली. त्याची ट्रेन-प्रवासाची गोष्ट पण खोटी निघाली जेव्हा त्याच्या एका मैत्रिणीनेत्याचं तिकीट वापरलं गेलं नसल्याचंसांगितलं. आताजॅक मकलौघया नावाने ओळखला जाणारा तेस्सिएर सप्टेंबर २०१२ पोलिसांच्या तावडीत सापडला. ५५ वर्षांनतर मारिया रिदुल्फच्या कुटंबाला न्याय मिळाला.