Get it on Google Play
Download on the App Store

सिंथीया एप्प्स


 जून १९९४ मध्ये जेम्स फाऊंटेन ने सांगितलं की त्यांना त्यांच्या गॅरेज मध्ये एका टेबलाजवळ २९ वर्षांच्या सिंथीया एप्प्स चे अवयव सापडलेत. त्याने सांगितलं की शव तिथे कसं आलं हे त्याला माहिती नाही आणि त्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं. तपासानंतर समजलं कि मृत्यूआधी एप्प्सचा शारिरिक संबंध आला होता आणि नंतर तिला चाकुने मारण्यात आलं होतं. तिच्या शरिराला सहज विल्हेवाट लावता यावी म्हणून खूप वाईट पद्धतीने कापलं होतं. तिचं डोकं शरिरापासुन जवळ जवळ वेगळंच झालं होतं. २०१० मध्ये बफेलो पोलिस विभागाचे तपास अधिकारी चार्ल्स अरोनका आणि लिस्सा रेडमोंडने परत तपास सुरू केला आणि फाऊंटेन जो आता पन्नास वर्षांचा होता, त्याच्या भूतकाळाची चौकशी करण्यास सुरूवात केली. आत्तापर्यंत त्यावर अनेक बलात्कारांचे आरोप होते आणि तो एका खुनासाठी शिक्षा भोगत होता. तो काही काळ केंद्रिय न्यूयॉर्क मनोरोग केंद्रातही होता. पोलिसांनी त्याच्या डी. एन. . च्या नमुन्यांना १९९४ च्या खुनाच्या पुराव्यांशी जुळवुन पाहिलं. ते जुळले. जेव्हा त्याला रिपोर्ट दाखवले गेले तेव्हा फाऊंटन ने आरोप मान्य केले आणि त्याला १ जुलै २०१३ ला २३ वर्षांचा तुरूंगवास झाला.