Android app on Google Play

 

मेरी किम्मेल

 

 मार्च १९८८ मध्ये लिसा मेरी किम्मेल नावाच्या एका महिलेने बिल्लींगस, मोंटाना ला आपल्या आई बाबांच्या घरी जायचा विचार केला. जाता-जाता तिला रस्त्यात तिच्या बॉयफ्रेंडलाही घ्यायचं होतं. ती तिथे पोहोचलीच नाही आणि तिच्या गायब होण्याच्या ८ दिवसांनंतर तिचं शव कैस्परच्या थोडं बाहेर नार्थ प्लात्ते नदीत तरंगताना दिसलं. तिची गाडी , चेरी मज्दा कंपनीची सी. आर. एक्स. , गायब होती जिच्या नंबरप्लेट वर ‘लाल मिस’ असं लिहीलेलं होतं. पुराव्यासाठी तिच्या कब्रवर एक माफीनाम्यासारखं पत्र होतं ज्यावर ‘स्ट्रींगफेलो हॉके’ अशी सही होती. ते टी. व्ही. मालिका एर्वोल्फ मधल्या मुख्य भूमिकेचं नाव होतं. २००२ मध्ये तपास अधिकाऱ्यांनी तिच्या बलात्काराच्या किटची पुन्हा नीट तपासणी केल्यावर ते कोलोरॅडो च्या डेल वायने ईटन या कैद्यापर्यंत पोहोचले. ईटनचं हास्ताक्षर चिट्ठीतल्या हस्ताक्षरासारखंच होतं आणि माज्दा सी. आर. एक्स. त्याच्या घराच्या आवारात पुरलेली सापडली.