Get it on Google Play
Download on the App Store

डाएन मैक्सवेल जैक्सन

 एफ. बी. आय. मझ्ये एक वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे ज्यात हिसंक अपराधांमध्ये शिक्षा मिळवुन देणाऱ्या एका फिंगरप्रींट टेक्नीशियनला पुरस्कृत केलं जातं. २०११ मध्ये हा पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्तीने १९६९ मध्ये एक केस सोडवली होती. १९६९ च्या ख्रिस्मसच्या वेळी हॉस्टनचा टेलिफोन ऑपरेटर डाएन जैक्सनचं त्याच्या ऑफिसच्या पार्किंग एरियामधुन अपहरण झालं होतं. जवळच्याच एका झोपडीत तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबुन आणि चाकुचे वार करून तिचा खून करण्यात आला होता. पोलिसांना फिंगरप्रींट्स मिळाले पण ते इतर कोणाच्याच फिंगरप्रींट्सशी जुळले नाहीत त्यामुळे त्यांची काही फार मदत झाली नाही. १९८९ मध्ये जैक्सनच्या भावाने, जो आता पोलिस अधिकारी होता, ही केस पुन्हा सुरू केली. हॉस्टनच्या एका वर्तमानपत्राने विनंती केली की जर याबाबतीत कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी पुढे यावे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे आणि फिंगरप्रींटसाठी डेटाबेस तयार झाल्यामुळे त्या फिंगरप्रींट्सचा पुन्हा तपास केला गेला. स्थानिक डेटाबेसमधुन काहीही माहिती मिळाली नाही. पुढे जुलै २००३ मध्ये एफ. बी. आय. चे टेक्निशिअन जिल किकन्डेला ७० लाख लोकांच्या फिंगरप्रींट्स तब्बल ५ तास तपासल्यावर मिळते – जुळते काही फिंगरप्रींट्स मिळाले. किकन्डेने त्यापेकी २० संभावित गु्न्हेगारांची एक यादी तयार केली. त्यापैकी एकावर पोलिसांची करडी नजर होती आणि तो म्हणजे जेम्स रे देविअस. देविअसला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा समजलं की जैक्सनच्या मृत्यूच्या काहीच दिवस आधी तो जेलमधून सुटून आला होता. २४ नोव्हेंबर २००३ ला आपल्या बहिणीच्या खुनाच्या तिन दशकांनतर डेविड जैक्सनने तिच्या गुन्हेगाराला स्वतःचा गुन्हा कबुलताना पाहिलं. देविअसला त्याचं उर्वरित आयुष्य सुद्धा तुरूंगातंच काढावं लागलं.