कुत्रा आणि त्याचा मालक
एक माणूस प्रवासाला जाण्याच्या तयारीत असता, आपला कुत्रा दरवाजात उभा असलेला त्याला दिसला. तेव्हा तो त्याला म्हणाला, अरे, तू इकडे पाहात उभा काय राहिला आहेस ? माझ्याबरोबर निघण्याची तयारी कर !' त्यावर कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब, माझी निघण्याची अगदी तयारी झाली आहे, आता उशीर होतो आहे तो फक्त आपल्यामुळे, आपण आपलं सामानसुमान बांधलं की मी आपल्याबरोबर निघालोच.'
तात्पर्य - एका कामाचे जे निरनिराळे भाग ज्या माणसाकडे सोपविलेले असतात, त्या सर्वांनी ते ते भाग पूर्ण केले म्हणजे सगळे काम पूर्ण होते, पण एखाद्याने आपल्या कामात आळस केला की एकंदर काम अपूर्ण राहून सर्वांचीच खोटी होते.