मोठे मासे व लहान मासे
एका कोळ्याने मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे टाकले होते. त्यात लहान मोठे पुष्कळ मासे सापडले. तो कोळी जेव्हा जाळे वर ओढू लागला, तेव्हा त्यात जे लहान मासे होते ते जाळ्याच्या भोकातून पटापट निसटून समुद्रात गेले व जे मोठे होते ते सगळे कोळ्याला सापडले.
तात्पर्य
-मोठेपणाबरोबरच माणसाची सुखदुःखेही वाढत असतात.