Get it on Google Play
Download on the App Store

लांडगा आणि गाढव

एकदा सगळे लांडगे एकत्र होऊन त्यांनी एकमताने आपल्यातल्या एका लांडग्याला आपले नेतृत्व दिले. तो लांडगा मोठा लबाड, आपमतलबी व गोडबोल्या होता. त्याने दुसरे दिवशी आपल्या सगळ्या जातवाल्यांची एक मोठी सभा भरविली व त्यांना उपदेश केला, 'मित्रहो ! आपले सर्वांचे हित जिच्यावर अवलंबून आहे अशी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावी, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन मी आज ही सभा भरवीत आहे. ती गोष्ट म्हणजे 'स्वार्थ त्याग' एकमेकांविषयीची बंधुत्वाची भावना वाढवून सार्वजनिक हित साध्य करून देणारा स्वार्थत्यागासारखा सद्‌गुण दुसरा नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवून, शिकारीत जे काय तुम्हाला मिळेल, ते खाण्यापूर्वी आपल्या एखाद्या भुकेलेल्या जातिबांधवाला त्यातला थोडा तरी भाग द्यायला तुम्ही विसरू नका.' हे भाषण ऐकून जवळच असलेला एक गाढव त्या लांडग्याला म्हणाला, 'शाबास, शाबास ! किती सुंदर उपदेश हा ! इतरांनी मात्र आपल्या अन्नाचा भाग आपल्या जातिबांधवांना दिला पाहिजे, आणि लांडगेदादा तुम्ही स्वतः मात्र काल आपल्या गुहेत लपवून ठेवलेली ती लठ्ठ मेंढी एकटेच खाणार ना ? शाबास, शाबास ! याचं नाव स्वार्थत्याग !'

तात्पर्य

- जी गोष्ट आपण दुसर्‍याला सांगतो, तिच्या सर्वस्वी विरुद्ध असे आचरण जर आपण करू लागलो तर एखादा स्पष्टवक्ता चारचौघांत आपला उपहास करण्यास चुकणार नाही.

इसापनीती कथा २५१ ते ३००

इसाप
Chapters
रानटी व गावठी हंस आजारी गाढवी व भुकेले लांडगे जीभ कोल्हा आणि लांडगा पावसाचा थेंब कस्तुरी मृग कोल्हा आणि काटेझाड कुत्रा व बोकड माणूस व सिंह कानस व साप दोन उंदीर कैदी झालेला लांडगा लांडगा आणि गाढव लांडगा आणि सिंह कोंबडी आणि साळुंकी वानर आणि सुतार करडू आणि लांडगा खेचर कुत्रा आणि कोंबडी लांडगे आणि बोकड माणूस आणि मुंगूस म्हातारा कुत्रा म्हातारा आणि त्याचे मुलगे मुंगी आणि माशी पशू, पक्षी आणि वटवाघूळ साप आणि माणूस साळू आणि लांडगा ससा आणि कासव ससे आणि बेडूक साळुंकी आणि इतर पक्षी सिंह आणि रानडुक्कर सिंह आणि हरिण वानर व अग्नी काळा माणूस उंट व त्याचा मालक उंट आणि माकड उंदीर आणि बोका टोळ आणि गाढव सिंह व त्याचे तीन प्रधान सिंह, गाढव आणि कोल्हा सिंह, अस्वल आणि कोल्हा शेतकरी आणि चिमण्या मुलगा आणि नाकतोडा मोठे मासे व लहान मासे मोर आणि कावळा म्हातारी आणि तिची मेंढी लावी पक्षीण व तिची पिले कुत्रा आणि त्याचा मालक कोंबडी आणि कोल्हा