लांडगा आणि सिंह
एका लांडग्याने मेंढवाड्यातून एक कोकरू चोरले आणि ते घेऊन तो आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक सिंह भेटला. त्याने ते कोकरू त्याच्याकडून हिसकावून घेतले. तेव्हा सिंहापासून दूर जाऊन लांडगा त्याला म्हणाला, 'अरे, माझं कोकरू तू माझ्याकडून केवळ अन्यायानं घेतलंस.' सिंह त्यावर उत्तरला, 'अगदी खरंच, हे कोकरू तुझंच, यात काहीच संशय नाही, ते एखाद्या मित्रानं किंवा नातेवाईकानंच तर तुला दिलं असेल नाही का?'
तात्पर्य
- आपण अन्यायाने उपटलेली एखादी वस्तू आपल्याकडून जबरदस्तीने कोणी घेऊ लागला असता, आपण जर त्याला नीतीच्या गोष्टी सांग लागलो तर तो त्या ऐकून घेणार नाही, इतकेच नव्हे, तर उलट आपला उपहास करील.