कस्तुरी मृग
एकदा एका कस्तुरी मृगाची शिकार करण्याकरिता काही शिकारी लोक व त्यांचे कुत्रे यांनी त्याचा पाठलाग केला असता ते हरिण पळता पळता दमले व जीव आता कसा काय वाचवावा याच्या काळजीत पडले. तेवढ्यात त्याला सुचले की, हे शिकारी लोक आपल्याजवळ कस्तुरीसाठी मागे लागले आहेत. तेव्हा कस्तुरी जर आपण काढून टाकली तर ते शिकारी आपल्यामागे लागणार नाहीत. म्हणून त्याने आपल्याजवळील कस्तुरी टाकून दिली व ती घेऊन त्याच्या जीवास अपाय न करता ते शिकारी तेथून निघून गेले.
तात्पर्य
- ज्यामुळे दुष्ट लोकांचा त्रास वरचेवर होतो, ते कितीही मुल्यवान असले तरी शहाणी माणसे त्याचा त्याग करून स्वतःचा जीव वाचवू शकतात.