उंट आणि माकड
एकदा सर्व जनावरें मिळून एक समारंभ साजरा करीत असता, माकडाने असा नाच करून दाखविला की, तो पाहून सर्वांनी, 'वाहवा ! वाहवा !' म्हणून माना डोलावल्या. ते पाहून आपणही नाचून दाखवावे असे उंटाला वाटले व तोही नाचू लागला. परंतु त्याचे ते वेडेवाकडे नाचणे पाहून सगळी जनावरे कंटाळली व त्याची टर उडवू लागली, आणि भर सभेतून त्यांनी उंटाला हाकलून दिले.
तात्पर्य
- ज्याचे काम त्यानेच करावे.