आजारी गाढवी व भुकेले लांडगे
एक गाढवी फार दिवस आजारी पडली होती. ती आता मरेल अशी बातमी पसरली. ती बातमी ऐकून काही लांडगे त्या गाढवीच्या समाचारास आले व लांबूनच विचारू लागले, 'बाईंची प्रकृती कशी आहे ?' हा प्रश्न ऐकून गाढवीजवळील तिचा मुलगा त्यांच्याकडे येऊन म्हणाला, 'अहो, बाईंची प्रकृती अशी व्हावी जशी तुमची इच्छा आहे, तशी ती अद्याप झाली नाही.'
तात्पर्य
- आजारी माणसाच्या समाचारास बरेचजण येतात. पण त्यात स्वार्थासाठीच फार जण येतात.