Get it on Google Play
Download on the App Store

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा)

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा)

अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा - संवाद - गीतलेखनाचे काम केले.त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले.

   

मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले. संताच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणित्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.

   

आरंभी ते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्‌मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबर्‍या व युद्धाच्या सावल्या हे नाटक - इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.

   

चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार, कथाविषयाला खुलावट आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. १९४२ च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवड्यांची निर्मिती केली होती.

   

गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या  बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे `आधुनिक वाल्मिकी' अशी पदवी बहाल केली. यातूनच त्यांच्या रसिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.

   

गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते.

१९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे