Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

फुलाफुलांचा गंध वाहता वार...

फुलाफुलांचा गंध वाहता वारा

तुमच्या ओठी सूर होउनी आला

तुम्ही पाहिले निळेभोर आकाश

तुम्ही पाहिला निर्मळ नितळ प्रकाश

कधी न ज्याला मरण, जरा कधी नाही

ते देवांचे काव्य जिवंत प्रवाही

तुम्ही थरारुन मिटता लोचन ध्यानी

ये कमळापरि फुलुन सहस्‍त्र दलांनी

काशफुलांच्या शुभ्र शुभ्र लाटांत

हळव्या हिरव्या दिशामुक्‍त वाटांत

वीज माळल्या उत्कत श्याम घनात

अन् शरदाच्या सोनफुलोर मनात

कधी झराझर झरणार्‍या धारांत

कधी झळाळत किरणांच्या तारांत

लाडिक अवखळ चालीतून झर्‍यांच्या

दंवात भिजल्या डोळ्यांतून पर्‍यांच्या

तुम्ही ऐकिली दिव्य पुरातन एक

सौंदर्याची ती चिरनूतन हाक

कसे अकारण झाले कंपित प्राण ?

आनंदाचे गीत म्हणाले कोण ?

या मातीवर, फुलांफुलांवर इथल्या

मेघांवर अन् जलधारांवर इथल्या

हृदय ओतुनी केली कोणी प्रीत ?
जय रवींद्र हे, जयजय शाश्‍वत गीत

संन्यासाची फेकुनि भगवी कफनी

कुणी चुंबिली बेहोषुनि ही धरणी ?

कुणी पाहिला ईश्‍वर आनंदात ?

जय रवींद्र हे, जयजय शाश्‍वत गीत

दूर तिथे त्या धगधगत्या शेतात

खपतो हलधर निथळुनिया घामात

कोणी केला प्रणाम त्या श्रमिकाला

आणि म्हणाला फेकुनि दया जपमाला ?

रंगगंधरससौंदर्याचा जय हो

फुलणार्‍या प्रत्येक फुलाचा जय हो

तुमचे जीवन अमरण साक्षात्कार

आनंदाचा चिरंजीव उद्‌गार !

बाल गीते - संग्रह ३

संकलित
Chapters
समर्थ आहे भारतभूमी , समर्...
आम्ही गीत तुझे गाऊ भा...
विश्‍वशांतीचे अन् समतेच...
तंत्र आणि विज्ञान युगातील...
ते देशासाठी लढले ते अम...
सैनिक आम्ही , आम्हां लाभल...
कशासाठी ? पोटासाठी ? द...
कण कण माझ्या तनुचा मिरवी ...
उत्क्रांतीचा आज आम्हांला ...
नमो मायभूमी , नमो पुण्यमा...
पसरलाय सागर दूरवर पहा ...
दरीत वसले गाव चिमुकले ...
श्रीशिवबांची माय जिजाई मह...
इथे गांधीजी राहात होते अ...
आमुचे प्रणाम बाबांना ...
चवदार तळ्याचे पाणी नव ...
फुलाफुलांचा गंध वाहता वार...
स्वातंत्र्याच्या संग्रामा...
तात्या टोपे तात्या ...
देह मंदिर चित्‍त मंदिर एक...
सताड उघडा खिडक्या -दारे ,...
सर्वात्मका शिवसुंदरा स...
आकाशातुन पतंग काटले त्...
आम्ही पाखरे मुठीत आमुच्या...
भिऊन पावलं टाकू नका , भ...
संपला अंधार हा झाली नवी प...
पहा संपला तिमिर सर्व हा ...
अणुरेणूतुनि शब्द प्रगटती ...
दया गाणारे हात प्रभो ,...