कळिकाळ कांपे नाम उच्चारित...
कळिकाळ कांपे नाम उच्चारितां । विठठल म्हणतां कार्यसिध्दी ॥१॥
त्रिअक्षरी जप सुलभ सोपारा । वाचे तो उच्चारा सर्वकाळ ॥२॥
भवताप श्र्म हरे भावव्यधा । आज नका पंथा जाऊं कोणी ॥३॥
नामाचा विश्वास दृढ धरा अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥