पंच महापातकीं विश्वासघातक...
पंच महापातकीं विश्वासघातकी । रामनामे सुखी विश्वजन ॥१॥
महा पापराशी वाल्हा तो तारिला । उध्दार तो केल गणिकेचा ॥२॥
पुत्राचिया नामें वैकुठाची गती । अजामेळा मुक्ती हरीनामें ॥३॥
नामेंची तरले नर आणि नारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥