निर्मळेसी करीतां स्नान । ...
निर्मळेसी करीतां स्नान । कोटी प्रयाग समान ॥१॥
तेथें करितां अन्नदान । स्वये तुष्टे नारायण ॥२॥
तेथें करितां प्रदक्षिणा । कोटि तीर्थ घडली जाणा ॥३॥
ऐसी विख्यात मेहुणपुरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥