अवघे सुखाची सांगाती । दु ...
अवघे सुखाची सांगाती । दु:ख होतां पळतीं आपोआप ॥१॥
भार्या पुत्र भगिनी माता आणि पिता । हे अवघे सर्वथा सुखाचेचि ॥२॥
इष्ट आणि मित्र स्वजन सोयरे । सुखाचे निर्धारिं आप्तवर्ग ॥३॥
अंतकाळी कोण नये बरोबरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥