जें तुम्हां कळें तें करा ...
जें तुम्हां कळें तें करा । गोमटें बरें कां वोखटें गोड दिसे ॥१॥
मी तों झालें बोलोनी उतराई । तुमचेचिये पायीं समर्पिलें ॥२॥
होता जो वृत्तांत माझिये जीवींचा । बोलियेला वाचा तुम्हांपुढें ॥३॥
सोयरा म्हणे माझें सकळ गणगोत । तुंचि माझें हित करी देंवा ॥४॥