सुलभ सोपे वाचे नाम गातां ...
सुलभ सोपे वाचे नाम गातां । पापाच्या चळथा पळती पुढें ॥१॥
वाचे हरी हरी जो कोणी उच्चारी । नर अथवा नारी पवित्र ते ॥२॥
जातवित गोत नको हा विचार । हरिनाम सार कलिमाजी ॥३॥
सोयरा म्हणे मज नामाची आवडी । जाय देशोधडी कळिकाळ ॥४॥