सुखाचें हें नाम आवडीनें ग...
सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचें आळवावें विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार । नामाचा गजर सर्व काळ ॥२॥
कामक्रोधांचे न चलेचि कांही । आशा मनशा पाहीं भुर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरि हरि । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥