माझें माझें म्हणुनी गुंतल...
माझें माझें म्हणुनी गुंतले हावभरी । वांया या संसारी मृगजळा ॥१॥
आपुली आपण करा आठवण । संसार बंध तोडा वेगीं ॥२॥
नाम निज नौका विठ्ठल हें तारूं । भवाचा सागरू उतरील ॥३॥
ह्याची विश्वास धरावा अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥