आणिक देवाचे न करा साधन । ...
आणिक देवाचे न करा साधन । बायां होय शीण आदि अंती ॥१॥
आपुलिया पोटा आणिकां पीडिती । ते काय पुरविती मन इच्छा ॥२॥
रोटीसुठीलागीं पिडिताती जगा । हेंचि त्यांचे अंगा देवपण ॥३॥
म्हणोनी तयांचे नका पडूं भरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥