नामेचि पावन होती जगीं जाण...
नामेचि पावन होती जगीं जाण । नाम सुलभ म्हणा विठोबाचें ॥१॥
संसार बंधने नामेंचि तुटती । भुक्ति आणि मुक्ति नामापासीं ॥२॥
नाम हें जपतां पाप ताप जाय । अनुभव हा आहे जनामाजी ॥३॥
नामाचा गजर वाचें जो उच्चारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥